दि. 06 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन भाग – 2 अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे बेनवडी येथील प्रसिद्ध श्री हरिनारायण स्वामी मंदिर परिसरात असलेल्या वृंदावन समाधीस्थळांवरील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शिलालेख नुकताच अभ्यासकांच्या नजरेस पडला असून, त्यामधून भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान, वैष्णव भक्तिपरंपरा आणि संतसंस्कृतीचा अनमोल वारसा समोर आला आहे. श्री हरिनारायण स्वामी मंदिराच्या मुख्य तटबंदी प्रवेशद्वारासमोर असलेल्या पाच ...

श्रीगोंदा | दि. ६ जून 2026 गणेश कविटकर   मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड पक्षाच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून हा ऐतिहासिक सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केले. प्रारंभी ...

कर्जत तालुका – शिलालेख वाचन भाग १ गुरव पिंपरी येथे १६६४ सालातील मंदिर जीर्णोद्धाराची नोंद उजेडात…   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील सामाजिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी येथे आढळून आला आहे. या शिलालेखाचे वाचन पुण्याचे प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले असून संशोधन राजेश पोपट ...

दि. 04 जून 2026 गणेश कविटकर   शिलालेखांतून घडते भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन   श्रीगोंदा : इतिहास हा केवळ ग्रंथांच्या पानांतच नसतो, तर तो आपल्या गावोगावी विखुरलेल्या वारसा स्थळांमध्ये, मंदिरांच्या भिंतींवर, बारवांच्या कडांवर, समाधींवर आणि शिलालेखांमध्ये जिवंत स्वरूपात कोरलेला असतो. अशाच दुर्लक्षित पण अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती महत्त्वपूर्ण कार्य ...

श्रीगोंदा | दि. 27 मे 2026 गणेश कविटकर मांडवगण-श्रीगोंदा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, परिसरातील ऐतिहासिक व पुरातन “काशीबारव” सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. वारसा संवर्धनासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जनजागृती, पाठपुरावा आणि संघर्षाला अखेर यश मिळाल्याने इतिहासप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काशीबारव परिसरात पुन्हा रस्ता खोदकाम सुरू झाल्यानंतर बारवेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात ...

श्रीगोंदा | दि. 08 एप्रिल 2026 गणेश कविटकर   सह्याद्रीच्या कड्याकपारीत दडलेल्या इतिहासाला स्पर्श करत, तरुणाईच्या खांद्यावर शिवकार्याची पताका उंचावणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने गडकिल्ले भटकंतीच्या क्षेत्रात एक अभिमानास्पद मैलाचा दगड गाठला आहे. १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण ट्रेकिंग मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याच्या निमित्ताने पिकनिक पॉइंट, श्रीगोंदा येथे भव्य शतक महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. २०१८ साली किल्ले धर्मवीरगड येथे छत्रपती संभाजी महाराज ...

श्रीगोंदा | दि. 19 मार्च 2026 गणेश कविटकर   हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी आणि पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर आयोजित करण्यात आलेला बलिदान सप्ताह अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर शंभू भक्तीने ...

पेडगाव (ता. श्रीगोंदा) | दि. १७ मार्च २०२६ गणेश कविटकर   हिंदवी स्वराज्याचे शूर, धर्मरक्षक आणि अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्यासाठी पेढगाव येथे ‘बलिदान सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने १७ ते १८ मार्च २०२६ दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या ...

शिवाई देवीच्या साक्षीने १०० वी मोहिम अर्पण; ११३ शिवप्रेमींची प्रेरणादायी उपस्थिती श्रीगोंदा | दि. १७ मार्च २०२६ गणेश कविटकर जुन्नरच्या पवित्र भूमीत वसलेल्या किल्ले शिवनेरी या शिवजन्मभूमीवर रविवारी इतिहासाचा एक अभिमानास्पद क्षण साकार झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने आपल्या ट्रेकिंग प्रवासातील १०० वी मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करत ट्रेकिंग विश्वात शतकिय उंची गाठली. या ऐतिहासिक मोहिमेत तब्बल ११३ शिवप्रेमी सदस्यांनी उत्साहाने सहभाग ...

छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी प्रवास : किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड श्रीगोंदा | दि. 21 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पराक्रम, त्याग आणि धर्मनिष्ठेची साक्ष देणाऱ्या भूमीतून यंदा पुन्हा एकदा धर्मवीरांचा जयघोष दुमदुमला. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने ...