बदलत्या युगात प्रसारमाध्यमांमध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. पूर्वी वृत्तपत्रे, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक नियतकालिकांद्वारे माहिती पोहोचत होती, आज मात्र टीव्ही चॅनल्स, न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी क्षणात घराघरात पोहोचते.
या नव्या युगात, माहितीचा वेग आणि तिची विश्वासार्हता जपणं हीच खरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारत “नव स्पंदन 24” हे पोर्टल महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत सत्य, सकारात्मक आणि समाजउपयोगी बातम्या पोहोचवण्यासाठी कार्यरत होत आहे.
आपला श्रीगोंदा तालुका हा सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक परंपरेने समृद्ध, तसेच राजकीयदृष्ट्या प्रगल्भ या भूमीतील प्रत्येक घडामोड, विकासाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल आणि लोकजीवनातील प्रत्येक स्पंदन आम्ही “नव स्पंदन 24”च्या माध्यमातून जगासमोर आणू इच्छितो.
ही फक्त बातम्या देणारी जागा नाही, तर श्रीगोंद्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा आहे. आपल्या प्रामाणिक प्रतिसादातूनच आमचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरतील, हीच मनापासून अपेक्षा आहे.

आपला,
गणेश रमेश कविटकर
संपादक – नव स्पंदन 24
मो. क्रं. 9595489999, 9423462787.
(श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर , महाराष्ट्र)