तलावातील पाणी वापरावरील बंदी उठवून शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; कोळगाव फाट्यावर शेतकऱ्यांची निर्णायक बैठक श्रीगोंदा | दि. २७ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना तलावांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यास घातलेली बंदी आणि बंद करण्यात आलेला शेतीपंपांचा वीजपुरवठा यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याचा ...
अहिल्यानगर | दि. ०४ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर कारागृहातील बंदीवानांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासोबतच मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्व परिवर्तनाला चालना देण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा कारागृहात २ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला अनुसरून बंदीवानांसाठी वर्षभर विविध सण, उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक ...
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ४० हजारांहून अधिक नोंदींच्या पडताळणीची गरज श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीतील नाव हीच पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले नाव, पत्ता, वय, लिंग ...
अहिल्यानगर, दि. २७ : राष्ट्रभक्तीचा हुंकार, भक्तीचा महासागर आणि एकजुटीचा अभूतपूर्व संगम असा ऐतिहासिक क्षण श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे अनुभवायला मिळाला. संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २५ ऑगस्ट रोजी तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनातून साकारलेल्या ...
पुणे | दि. २७ ऑगस्ट २०२६ ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नव्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा ...
आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वगुणांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक; श्रीगोंदकरांना केले भावनिक आवाहन श्रीगोंदा |दि. २० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर “आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीगोंदकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विक्रमला सुट्टी द्यावी,” असे आवाहन भाजपा ...
श्रीगोंदा : दि. १५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगडावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला आणि स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागवली. राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक तसेच श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे व नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...
वर्षभराच्या पाठपुराव्याला यश; अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाईला मिळणार अधिक बळ. टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांच्या प्रयत्नाला यश श्रीगोंदा : दि. 30 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्यात वाढत्या अवैध दारूविक्री, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर मद्यव्यवसायावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय श्रीगोंदा शहरात सुरू करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर दीर्घकाळ प्रलंबित असलेली ...
श्रीगोंदा | दि. 26 जून 2026 गणेश कविटकर ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अनालॉग चीज (Cheese Analogue) या विषयावर गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुण्यात झालेली कारवाई ही ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असल्याची भावना आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली आहे. पनीरच्या नावाखाली अनालॉग चीजचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने घेतलेली ...








