कर्जत | दि. 20 मार्च 2026 गणेश कविटकर कोंभळी (ता. कर्जत) : ॐ चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त गावात भव्य कीर्तन महोत्सव व नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. ...
श्रीगोंदा | दि.19 मार्च 2016 गणेश कविटकर श्रीगोंदा : हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडवा निमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीने श्रीगोंदा येथे भव्य, दिमाखदार व शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत हजारो अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली. श्रीगोंद्यासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा व कर्नाटक या ...
ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; शिस्तप्रिय दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष. कोंभळी|दि. 06 मार्च 2026 गणेश कविटकर कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र कोंभळी येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्याने परिसरात भक्तीचा उत्सवच निर्माण झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरेल निनादात आणि नाथ महाराज्यांच्या घोषणांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या ...
कोंभळी |दि . ०२ मार्च २०२६ गणेश कविटकर ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ वे वर्ष कोंभळी : अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात ...
श्रीगोंदा | दि. १९ फेब्रुवारी २०१६ गणेश कविटकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारव दीपोत्सव – पाचवे वर्ष उत्साहात साजरे श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर परिसर श्रीगोंदा, काशीबारव (मांडवगण रोड) व बेलवंडी ...
कुंभळी (ता.कर्जत, जि. अहिल्यानगर ) – अंधःकारावर प्रकाशाचा, अशुभावर मंगलतेचा आणि दुःखावर श्रद्धेचा विजय साजरा करण्याचा दिवस — दीपोत्सव! अशा या मंगल क्षणी बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कानिफनाथ मंदिर, कुंभळी येथे भक्तिमय वातावरणात दीपोत्सवाचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ कुंभळी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची ...





