अहिल्यानगरसह तीन जिल्ह्यांतील १.४५ लाख हेक्टर शेतीला लाभ; दक्षिण नगरच्या दुष्काळमुक्तीला मोठी चालना श्रीगोंदा | दि. ०१ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंबे–माणिकडोह बोगदा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा मिळाली आहे. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याद्वारे डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात वळविण्यात येणार असून, ...
पेडगावातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी निधी मंजूर; विखे-पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश श्रीगोंदा | दि. ०१ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या पेडगावच्या धर्मवीर गडाच्या विकासाला अखेर मोठी चालना मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासह गडाच्या जतन, संवर्धन व दुरुस्तीच्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य ...
शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांवर राजेंद्र म्हस्के आक्रमक; सुधारणा न झाल्यास ठेंभा मोर्चाचा इशारा श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. मात्र, हा आंदोलनाचा शेवट नसून प्रशासनाला दिलेली १५ दिवसांची मुदत आता खरी कसोटी ठरणार ...
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ४० हजारांहून अधिक नोंदींच्या पडताळणीची गरज श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीतील नाव हीच पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले नाव, पत्ता, वय, लिंग ...
उपजिल्हाधिकारी जितेंद्र इंगळे यांचा खांडगाव तरुणांच्या वतीने नागरी सत्कार, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते गौरव; ५१ कर्तबगार तरुणांचाही सन्मान खांडगाव : दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणाऱ्या खांडगावचे सुपुत्र तथा पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या यशाचा गौरव गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने केला. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार ...
श्रीगोंद्यात १५ शाळांची आमदार विक्रम पाचपुतेंकडून पाहणी; कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘क्लस्टर स्कूल’चा पर्याय श्रीगोंदा | दि.३० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवत आमदार विक्रम पाचपुते यांनी मतदारसंघातील १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपलब्धता आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा घेताना कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ...
श्रीगोंदा | दि ३० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराविरोधात आणि शेतकरी व नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, या मागणीसाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. वारंवार खंडित होणारी वीज, अनियमित लोडशेडिंग आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, या आंदोलनात हजारोंच्या संख्येने ...
श्रीगोंदा | दि. २७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर नागरिकांची गैरसोय दूर करून दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि एकाच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत असलेले मुद्रांक विक्रेते आता दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) कार्यालयाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी वेगळ्या ठिकाणी ...
अहिल्यानगर, दि. २७ : राष्ट्रभक्तीचा हुंकार, भक्तीचा महासागर आणि एकजुटीचा अभूतपूर्व संगम असा ऐतिहासिक क्षण श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे अनुभवायला मिळाला. संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २५ ऑगस्ट रोजी तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनातून साकारलेल्या ...
पुणे | दि. २७ ऑगस्ट २०२६ ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नव्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा ...









