शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सभा काशीबारव येथे उत्साहात; सहा तरुणांचा ‘आदर्श शिवदुर्ग मावळा व रणरागिणी’ पुरस्काराने गौरव   श्रीगोंदा | दि. २० सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर   गडकिल्ले ट्रेकिंग, वारसा संवर्धन आणि तरुणांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेलवंडी कोठार येथील काशीबारव परिसरातील साई मंगल कार्यालयात उत्साहात ...

अंकुश शिंदे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड अहिल्यानगर | दि. ०२ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर पत्रकारितेतील सातत्यपूर्ण योगदान, व्यावसायिक निष्ठा आणि सामाजिक बांधीलकीची दखल घेत अंकुश तुकाराम शिंदे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या अधिकृत आदेशानुसार त्यांची नियुक्ती १ सप्टेंबर २०२६ पासून प्रभावी झाली आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम ...

न्यायालयीन कागदपत्रे पुढे करत अॅड. राहुल जामदार यांचा पलटवार; “९.२५ कोटींच्या रकमेचा नाहाटांशी काडीमात्र संबंध नाही”   श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   ९ कोटी २५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाशी बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांचा संबंध जोडणे हे वस्तुस्थितीचा विपर्यास असून, न्यायालयीन कागदपत्रे याला स्पष्टपणे छेद देतात, असा जोरदार दावा नाहाटा यांचे वकील अॅड. राहुल ...

“मार्च २०२५ मध्ये विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नाला अखेर यश; जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय”   श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   पनीरच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग पनीरविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे आणि बंदीच्या निर्णयाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मनापासून स्वागत केले आहे. हा निर्णय केवळ ...

श्रीगोंदा | १९ जुलै २०२६   श्रीगोंद्याकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटोदा (ता. जामखेड) परिसरात घडली. या घटनेने श्रीगोंदा तहसील कार्यालयासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, खोदलेल्या रस्त्यांवरील अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार ...

अचानक आलेल्या पावसात घडली हृदयद्रावक घटना; घोडेगाव परिसरात शोककळा   श्रीगोंदा , दि. २२ जून 20206 गणेश कविटकर   ज्याच्या खांद्यावर भविष्यात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, जो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत होता, त्या २५ वर्षीय तरुणाला काळाने अक्षरशः क्षणार्धात हिरावून नेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना आज घोडेगाव येथे घडली. अभिषेक रूपचंद दरेकर या तरुणाचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी ...

भागवत धर्माचा निष्ठावंत वारकरी, संगीतसेवेचा अखंड दीप मालवला अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता. २३) वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदाय आणि संगीत क्षेत्राने एक अभ्यासू, सेवाभावी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ...

विसापूर : दि. 25 मे 2026 गणेश कविटकर “दत्तात्रय गावडे गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर महेश्वर पतसंस्था व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थेने १७ शाखांचा विस्तार करत तब्बल ३४० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी विश्वासपात्र आणि सर्वसामान्यांच्या हिताची आहे,” असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काढले. विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट ...

श्रीगोंदा | दि. 10 मे 2026 गणेश कविटकर जनगणना 2027 अंतर्गत ग्रामीण भागातील घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांचे 12 दिवसीय प्रशिक्षण शिबिर श्रीगोंद्यातील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 16 मे ते 14 जून दरम्यान पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कामकाजासाठी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 597 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

३१ मार्च २०२६ पर्यंत संधी; मालमत्ता कर थकबाकीदारांनी लाभ घ्यावा   श्रीगोंदा  | दि. १९ मार्च २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नगरपरिषदेकडून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकित मालमत्ता कराच्या रकमेवरील दंड व शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी विहित ...