सखी सन्मती फाउंडेशनतर्फे १४ ऑक्टोबरला श्रीगोंद्यात भव्य दिव्य दांडिया स्पर्धा; विजेत्यांना १० हजार १ रुपयांचे प्रथम पारितोषिक   श्रीगोंदा | दि. ०९ ऑक्टोबर २०२६ गणेश कविटकर   महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी मिळावी आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने सखी सन्मती फाउंडेशनच्या संस्थापिका हेमांगी प्रशांत ओगले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून बुधवार, दि. १४ ...

प्रथम क्रमांकासाठी २,५०१ रुपये; घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना सहभागाची संधी श्रीगोंदा | दि. ०७सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर   पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत ‘इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांना या स्पर्धेत ...

७ सप्टेंबरपर्यंत काम सुरू करा; अन्यथा ८ सप्टेंबरपासून PWD कार्यालयात ठिय्या आंदोलन   श्रीगोंदा | दि. ०४ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर   पेडगाव–श्रीगोंदा (MDR-62) या महत्त्वाच्या मार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदाचे संचालक श्री. प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेडगाव, चोराचीवाडी, अधोरेवाडी व नवनाथनगर ...

शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांवर राजेंद्र म्हस्के आक्रमक; सुधारणा न झाल्यास ठेंभा मोर्चाचा इशारा   श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. मात्र, हा आंदोलनाचा शेवट नसून प्रशासनाला दिलेली १५ दिवसांची मुदत आता खरी कसोटी ठरणार ...

श्रीगोंदा | दि ३० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराविरोधात आणि शेतकरी व नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, या मागणीसाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. वारंवार खंडित होणारी वीज, अनियमित लोडशेडिंग आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, या आंदोलनात हजारोंच्या संख्येने ...

श्रीगोंदा | दि. २७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   नागरिकांची गैरसोय दूर करून दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि एकाच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत असलेले मुद्रांक विक्रेते आता दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) कार्यालयाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी वेगळ्या ठिकाणी ...

श्रीगोंदा : दि. 26 जून 2026 गणेश कविटकर समाजातील एकल महिलांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणारा आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन श्रीगोंदा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमातून एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते होत्या. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका ...

दि. 03 जून 2026 गणेश कविटकर   देशाचे संरक्षण करणारे सैनिक, समाजाला दिशा देणारे शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच भावनेतून लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व अग्नीपंख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान, शिक्षक, अधिकारी तसेच नुकतेच सैन्यदलात भरती झालेल्या जवानांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ...

लोणी व्यंकनाथमध्ये वाढदिवस साजरा झाला समाजहिताच्या संकल्पांनी; विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रामस्थ भारावले श्रीगोंदा : दि. 26 मे 2026 गणेश कविटकर आजच्या दिखाऊ आणि खर्चिक वाढदिवसांच्या काळात लोणी व्यंकनाथ येथे एका वाढदिवसाने समाजासमोर आदर्श निर्माण केला. जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त “जागर युवा प्रतिष्ठान” या सामाजिक संघटनेचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. हा सोहळा केवळ ...

आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत रामदास झेंडे मित्रमंडळाचा समाजाला आदर्श संदेश श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर आयुष्यभर कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला देणाऱ्या ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. माता लिलाबाई झेंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास झेंडे मित्रमंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील तब्बल १६३ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या ...