सरदार वाबळे गढीच्या शिलालेखातून उलगडला पानिपतवीर जानराव वाबळे यांचा ऐतिहासिक वारसा……   श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर   अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव हे गाव ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. या गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या सरदार वाबळे गढीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुमारे २७० वर्षांपूर्वीचा शिलालेख आता इतिहासाच्या नव्या दालनाचे दरवाजे उघडत आहे. या शिलालेखात पानिपत युद्धातील वीर सरदार ...

एकाच बारवेवर दोन शिलालेख; जलसंवर्धन, दानपरंपरा आणि लोककल्याणाचा दुर्मीळ वारसा दि. 14 जून 2026 गणेश कविटकर  कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 8   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे शहर केवळ व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे, तर ऐतिहासिक वारशामुळेही विशेष महत्त्वाचे ठरत आहे. कर्जत-शिंदेवाडी मार्गालगत असलेल्या एका प्राचीन बारवेवर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचे दोन शिलालेख आढळून आले असून, या शिलालेखांमधून ...

दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 7   थेरगाव, ता. कर्जत (प्रतिनिधी) : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा आणि मराठाकालीन ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात आढळून आला आहे. तब्बल २८२ वर्षांपूर्वी सात गावांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात ...

मराठा वैभव, देवीभक्ती, दानपरंपरा आणि ग्रामप्रशासनाचा दुर्मीळ पुरावा दि. 10 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 6 अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात आढळलेला आणखी एक शिलालेख मराठाकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ओवऱ्यांमधील एका खांबावर कोरलेला हा शिलालेख केवळ ...

राशीनच्या जगदंबा मंदिरात सापडला मराठाकालीन संस्कृत शिलालेख दि. 09 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 5   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात मराठाकालीन संस्कृत भाषेतील एक दुर्मिळ शिलालेख आढळून आला असून, तो स्थानिक इतिहास, देवीभक्ती, कुलपरंपरा आणि तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून ...

दि. 08 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 4   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे चांदेबुद्रुक येथील प्राचीन खंडोबा मंदिरात आढळून आलेल्या मोडी लिपीतील शिलालेखाने मराठाकालीन धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू उजेडात आणला आहे. चांदे-मिरजगाव मार्गावरील या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला चार ओळींचा हा शिलालेख अठराव्या शतकातील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले ...

लोहोबाईच्या विहिरीची स्मृती जपणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज   दि. 07 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 3 अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे आढळून आलेला मोडी लिपीतील शिलालेख अठराव्या शतकातील जलव्यवस्थापन, लोककल्याणाची भावना आणि धार्मिक परंपरांचा मौल्यवान इतिहास उलगडून दाखवतो. श्री भैरवनाथ महादेव मंदिराशेजारी असलेल्या प्राचीन बारवेवर कोरलेला हा शिलालेख इ.स. १७६२ मधील ...

दि. 06 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन भाग – 2 अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे बेनवडी येथील प्रसिद्ध श्री हरिनारायण स्वामी मंदिर परिसरात असलेल्या वृंदावन समाधीस्थळांवरील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शिलालेख नुकताच अभ्यासकांच्या नजरेस पडला असून, त्यामधून भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान, वैष्णव भक्तिपरंपरा आणि संतसंस्कृतीचा अनमोल वारसा समोर आला आहे. श्री हरिनारायण स्वामी मंदिराच्या मुख्य तटबंदी प्रवेशद्वारासमोर असलेल्या पाच ...

श्रीगोंदा | दि. ६ जून 2026 गणेश कविटकर   मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड पक्षाच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून हा ऐतिहासिक सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केले. प्रारंभी ...

कर्जत तालुका – शिलालेख वाचन भाग १ गुरव पिंपरी येथे १६६४ सालातील मंदिर जीर्णोद्धाराची नोंद उजेडात…   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील सामाजिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी येथे आढळून आला आहे. या शिलालेखाचे वाचन पुण्याचे प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले असून संशोधन राजेश पोपट ...