दररोज सुरू राहणार बाजार समिती; शेतकरी, व्यापारी आणि मत्स्य व्यवसायिकांना मोठा दिलासा. श्रीगोंदा | दि. ०३ जुलै २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शासनाच्या मंजुरीनंतर अवघ्या सहा महिन्यांत कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार प्रत्यक्ष कार्यान्वित होत असून, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले आधुनिक मच्छी मार्केट येथे सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. बाजार समितीचे ...
राष्ट्रीय कृषी दिन विशेष…. श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर पहाटेच्या अंधारात जग झोपेत असते; पण शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात तेव्हाच झालेली असते. त्याच्या पायाखाली ओलसर माती, डोक्यावर निळे आभाळ आणि मनात एकच ध्यास “देशातील कोणाच्याही ताटात अन्न कमी पडू नये.” हा ध्यासच भारताच्या कृषी संस्कृतीचा खरा आत्मा आहे. आज राष्ट्रीय कृषी दिन. हा दिवस केवळ शुभेच्छांचा नाही, ...
हिरडगाव | दि. 23 जून 2026 गणेश कविटकर गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि., हिरडगाव (युनिट क्र. ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात कारखान्याच्या आगामी हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात करण्यात आली. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ...
श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील बंद पडलेले अथवा अडचणीत सापडलेले तब्बल 17 साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले असून, सुमारे 11 लाख ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना आर्थिक न्याय देण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे केवळ एका महिन्याचे ऊस बिल ...
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने चालू ५१ व्या गळीत हंगामात सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ३१५० रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस दर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता ३००० रुपये तात्काळ देण्यात येणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली. ...
श्रीगोंदा : गौरी शुगरने चालू गाळप हंगामात दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. देवदैठण येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिटमुळे गाळप क्षमतेत वाढ झाली असून, या हंगामासाठी तब्बल दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३२०० रुपये भाव जाहीर ...
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य, स्पर्धात्मक व रास्त दर मिळावा, वजनातील फसवणूक थांबावी आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत या उद्देशाने श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळे येथील उपबाजार आवारात भुसार मालाच्या खरेदी-विक्री लिलावास अधिकृत सुरूवात करण्यात आली. समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी ही माहिती दिली. गुरुवार व रविवार अशा आठवड्यात दोन दिवस लिलावाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनाच्या दिवशीच मका, बाजरी, गहू ...







