शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे.
साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना १६ वा साईभूषण पुरस्कार २०२५ शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष व वारसा संवर्धक राजेश इंगळे यांना २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आला.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने आजपर्यंत केलेल्या गडकिल्ले संवर्धन ,बारव, पुरातन वारसा जतन व पानिपत वीरांचा वारसा संवर्धन कार्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रा. बाळासाहेब बळे सर, डॉ. अरुण रोडे, श्रीगोंदा सिटिझनचे संपादक अमीन शेख, अभिनेते गणेश लोणकर , पुरस्कारार्थी शहाजी जठार, सतिश भोईटे, प्राचार्य जालिंदर मोहिते, अध्यक्ष डॉ.सचिन जाधव यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवदुर्गची टीम उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर, संचालक अजितदादा दळवी, वारसा समितीचे उपाध्यक्ष दिगंबर भुजबळ, बारव मोहिम श्रीगोंदा तालुका समन्वयक अमोल बडे, सोशल मीडिया प्रमुख चेतन चौधरी, शिलेदार नितीश गायकवाड उपस्थीत होते.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
