श्रीगोंदा | दि. ०८ जानेवारी २०२६ गणेश कविटकर   महिला सक्षमीकरण व शेतकरी हिताच्या कार्याने बिहारची अभ्यास समिती भारावली… सहकारी चळवळीत माणुसकी, निःस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली, तर तिचे परिणाम किती व्यापक असू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा येथील वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य उपक्रम होत. सहकारी मित्राला आजारपणात उपचारासाठी आर्थिक मदत न मिळाल्याने ...

श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६ गणेश कविटकर, श्रीगोंदा   समाजाच्या आरोग्यासाठी सातत्याने झटणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहावा, या प्रेरणादायी उद्देशातून पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील पाटील मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या सहकार्याने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला यशस्वी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, ...

पानिपत वीरांच्या स्मृतींना अभिवादन; वारसा संवर्धनाचा जागर     श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराच्या उत्तर वेसजवळ असलेली, पानिपतच्या रणभूमीशी नाते सांगणारी ऐतिहासिक दिल्ली वेस ही शिंदेशाही ज्वलंत इतिहासाची साक्ष आहे. या दुर्लक्षित पण मौलिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी श्रमदानातून नववर्षाचे स्वागत ...

श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तसेच गौरी शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात आणि स्व. कुणाल दरेकर यांच्या अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा येथे तीव्र रास्तारोको आंदोलन केले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. ...

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे.   साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...

लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना….   श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...

महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.   बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...

हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाने परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.   कारखान्यातून दररोज बाहेर पडणारी काळी राख ...

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे 2009 सालच्या बारावी कला बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे जाज्वल्य उदाहरण घालत 117 पुस्तकांची मूल्यवान भेट दिली. अंदाजे 20,000 रुपयांच्या किंमतीची ही पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयाला सप्रेम अर्पण करण्यात आली असून, ग्रंथालय समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे. या उपक्रमात किशोर गुंजाळ, ...