दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 7   थेरगाव, ता. कर्जत (प्रतिनिधी) : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा आणि मराठाकालीन ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात आढळून आला आहे. तब्बल २८२ वर्षांपूर्वी सात गावांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात ...

आमदार विक्रम पाचपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती… श्रीगोंदा | दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १४३ तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ अंतर्गत शेत पानंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने कठोर तरतुदी लागू केल्या असून, खुले करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ...

मराठा वैभव, देवीभक्ती, दानपरंपरा आणि ग्रामप्रशासनाचा दुर्मीळ पुरावा दि. 10 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 6 अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात आढळलेला आणखी एक शिलालेख मराठाकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ओवऱ्यांमधील एका खांबावर कोरलेला हा शिलालेख केवळ ...

राशीनच्या जगदंबा मंदिरात सापडला मराठाकालीन संस्कृत शिलालेख दि. 09 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 5   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात मराठाकालीन संस्कृत भाषेतील एक दुर्मिळ शिलालेख आढळून आला असून, तो स्थानिक इतिहास, देवीभक्ती, कुलपरंपरा आणि तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून ...

दि. 08 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 4   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे चांदेबुद्रुक येथील प्राचीन खंडोबा मंदिरात आढळून आलेल्या मोडी लिपीतील शिलालेखाने मराठाकालीन धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू उजेडात आणला आहे. चांदे-मिरजगाव मार्गावरील या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कोरलेला चार ओळींचा हा शिलालेख अठराव्या शतकातील असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले ...

श्रीगोंदा | दि. 08 जून 2026 गणेश कविटकर राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, सन ...

कांद्याला २५ रुपये हमीभाव द्या; फसवा शासन निर्णय रद्द करा   श्रीगोंदा | दिनांक ८ जून 2026 गणेश कविटकर   कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति किलो किमान २५ रुपये हमीभाव तात्काळ जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी जाहीर केलेला शेतकरीविरोधी व दिशाभूल करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा ...

अहिल्यानगर | दि. 08 जून 2026 गणेश कविटकर   भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ८ ते ९ जून २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने ...

लोहोबाईच्या विहिरीची स्मृती जपणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज   दि. 07 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 3 अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे आढळून आलेला मोडी लिपीतील शिलालेख अठराव्या शतकातील जलव्यवस्थापन, लोककल्याणाची भावना आणि धार्मिक परंपरांचा मौल्यवान इतिहास उलगडून दाखवतो. श्री भैरवनाथ महादेव मंदिराशेजारी असलेल्या प्राचीन बारवेवर कोरलेला हा शिलालेख इ.स. १७६२ मधील ...

श्रीगोंदा | दि. 07 जून 2026  गणेश कविटकर डॉक्टर, अभियंता, सीए यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; मात्र सुजाण आणि जबाबदार गुंतवणूकदार घडविण्यासाठी कोणताही स्वतंत्र अभ्यासक्रम नसल्याने अनेक शिक्षित व अशिक्षित नागरिक अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणुकीचे शिकार होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी घराघरात आर्थिक विषयांवर खुली चर्चा होणे आणि वृत्तपत्र वाचनाची सवय लागणे अत्यंत गरजेचे असल्याचे ...