श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- गेल्या साडेसात वर्षांत राबवलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनेलला नगराध्यक्ष पदा सह सर्व २२ जागांवर विजय मिळवून द्या, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.   पोटे म्हणाले, “उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत श्रीगोंद्याचा विकास जिल्ह्यात नावलौकिक निर्माण करणारा ...

श्रीगोंदा – स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आकार घेत असताना अपक्ष उमेदवार आणि भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयश्री कोथिंबीरे यांनी शिवसेना उमेदवारांना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र “भाजप प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य मान देण्यात कमी पडते” असे म्हणत त्यांनी शिवसेना उमेदवार भामाताई कोथिंबीरे आणि बाबू धुमाळ ...

भाजपच्या प्रचार शुभारंभात झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर थेट निशाणा साधला. “माझ्यावर नेत्यांना फसवल्याचा आरोप करणाऱ्या आमदारांनी स्वतः १९८० ते २०१४ दरम्यान किती पक्ष बदलले, किती नेत्यांना फसवले आणि दरवेळी कोणती नवे चिन्हं स्वीकारली, याचा आरशात पाहून विचार करावा,” अशी कडक टीका पोटे यांनी माध्यमांशी बोलताना केली.   भाजपच्या पॅनल शुभारंभावेळी ...

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव गावात बुधवारची संध्याकाळ काळ बनून आली. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि क्षणात भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला आणि त्याखाली दबून दोन निरागस चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण गावात एकच हळहळ पसरली.   मयत मुलांची नावे – 🔸 प्राप्ती किरण महाडिक (वय १०) 🔸 शिवांश किरण महाडिक (वय ४)   मुलांची आई कावेरी ...

भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचारसभेत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दमदार उपस्थिती दर्शवत श्रीगोंदा शहराच्या भवितव्याचा रोडमॅप स्पष्ट केला. “श्रीगोंदा शहर आणि तालुका राज्यातील अव्वल पाच शहरांमध्ये आणण्याची क्षमता आपल्या टीममध्ये आहे. शहराचा विकास कुठेही कमी पडू देणार नाही. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना मदतीची गरज भासली, तर मी स्वतः मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन,” असा ठाम शब्द ...

श्रीगोंदा(प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या शुभारंभ प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी माझ्या मास्क वापरण्यावर टीका केली खरे तर पॅनल शुभारंभ प्रसंगी नोव्हेंबर २०१९ ते नगर पालिका कार्यकाळ संपे पर्यंत तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगर परिषद साठी किती निधी मिळवून दिला. याची माहिती ते देतील तसेच भविष्यात किती निधी देतील याची उत्सुकता म्हणून नागरिक जमले होते. आम्हालाही याचीच अपेक्षा ...

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील वातावरणात सकारात्मकतेची नवी ऊर्जा जाणवत आहे. प्रभागनिहाय दौरे, नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि शहराच्या विकासाबाबतची व्यापक दृष्टी या सर्वांमुळे सौ. भोस यांच्या प्रचाराला लक्षणीय गती मिळाली आहे.   प्रचारसभांमध्ये सौ. भोस यांनी श्रीगोंदासाठी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहराचा आराखडा ...

श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २० टक्के पगारवाढ जाहीर केली असून या निर्णयामुळे समूहातील सुमारे १६,५०० हून अधिक कर्मचारी लाभार्थी ठरणार आहेत. या वाढीची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.   बोत्रेपाटील म्हणाले, “कर्मचारी हीच ओंकार शुगर ग्रुपची खरी ताकद आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच समूहाने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद शहरातील जनमत कोणत्या दिशेने झुकत आहे, याची स्पष्ट जाणीव करून देणारा ठरत आहे.   गेल्या काही काळात संवादाचा अभाव, मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे शहराचा विकास ज्या गतीने व्हायला हवा होता, त्या गतीने झाला नाही. हा सर्व अनुभव डोळ्यासमोर ठेवत ...

श्रीगोंदा शहरात शिवसेनेच्या भव्य रॅलीनंतर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत शहराच्या राजकीय वातावरणाला वेगळी दिशा देणारी भाषणे झाली. सभेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी मनोहारक भाषण करत शिवसेनेच्या विजयशिल पॅनेलची घोषणा केल्यासारखीच आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली.   लोखंडे म्हणाले, “मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे हे श्रीगोंदा शहराची अस्मिता आहेत. गेल्या साडेसात वर्षांत पोटे दांपत्याने शहराच्या विकासाचा वेग वाढवला, नवनवीन ...