आमदार विक्रम पाचपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती… श्रीगोंदा | दि. 12 जून 2026 गणेश कविटकर   महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १४३ तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ अंतर्गत शेत पानंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने कठोर तरतुदी लागू केल्या असून, खुले करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ...

श्रीगोंदा | दि. 08 जून 2026 गणेश कविटकर राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, सन ...

अहिल्यानगर | दि. 08 जून 2026 गणेश कविटकर   भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ८ ते ९ जून २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने ...

श्रीगोंदा | दि. 07 जून 2026 गणेश कविटकर   प्रतिनिधी, श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी, मद्य तस्करी आणि बेकायदेशीर मद्य व्यवसायाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी श्रीगोंदा येथे स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे, अन्यथा १६ जून रोजी मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य जनजागृती परिषद, अहिल्यानगरचे ...

श्रीगोंदा | दि. 06 जून 2026 गणेश कविटकर   शासनाने जाहीर केलेल्या कथित फसव्या कर्जमाफीविरोधात तसेच संबंधित आदेशाच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जाहीर निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन शेतकरी एकजूट मंचाच्या वतीने करण्यात आले असून तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या ...

कर्तृत्ववान आयपीएस धनंजय कुलकर्णी यांच्यावर मुंबई पूर्व विभागाची धुरा….   श्रीगोंदा  | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : तालुक्यातील भानगाव या ग्रामीण मातीतून उभारी घेत देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलीस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय ...

श्रीगोंदा | दि. 27 मार्च 2026 गणेश कविटकर   शेतकरी सभासदांनी आपल्या नावावर असलेली दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची थकबाकी ३१ मार्चपूर्वी भरून शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागवडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने कर्जदार ...

श्रीगोंदा | दि. २३ जानेवारी २०२६ गणेश कविटकर   लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहरातील सोनिया गांधी पॉलिटेकनिक कॉलेज येथे भव्य मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. १८ वर्षे पूर्ण झालेल्या ...

श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६ गणेश कविटकर, श्रीगोंदा.   श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सुव्यवस्थित, नियोजित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने सर्व विकासक व जमीन मालकांची प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. इमारत परवाना मंजुरी प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेळबद्ध करण्यासह व्हॉलंटरी टाउन प्लॅनिंग स्कीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात ...

सातारा :  दि. ०५/०१/२०२६ सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तरुण कवी व व्याख्याते कार्तिक रामदास झेंडे यांनी सादर केलेल्या “माय” या कवितेला मान्यवर साहित्यिकांसह रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. सध्या पुणे येथे बी.ए.एल.एल.बी. चे शिक्षण घेत असलेल्या कार्तिक झेंडेंनी लहानपणापासूनच कविता लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीत आजवर दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले ...