कर्जत | दि. १० जानेवारी २०२६   व्हॉईस ऑफ मीडियाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी कुळधरण येथील शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र माने यांची एकमताने निवड करण्यात आली. कर्जत येथील विश्रामगृहात पार पडलेल्या कर्जत तालुका कार्यकारिणी निवड बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. बैठकीस संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, ...

श्रीगोंदा | दि. ०८ जानेवारी २०२६ गणेश कविटकर   महिला सक्षमीकरण व शेतकरी हिताच्या कार्याने बिहारची अभ्यास समिती भारावली… सहकारी चळवळीत माणुसकी, निःस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली, तर तिचे परिणाम किती व्यापक असू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा येथील वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य उपक्रम होत. सहकारी मित्राला आजारपणात उपचारासाठी आर्थिक मदत न मिळाल्याने ...

श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६ गणेश कविटकर, श्रीगोंदा.   श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सुव्यवस्थित, नियोजित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने सर्व विकासक व जमीन मालकांची प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. इमारत परवाना मंजुरी प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेळबद्ध करण्यासह व्हॉलंटरी टाउन प्लॅनिंग स्कीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात ...

महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.   बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...

नागपूर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक, रेडिओ क्षेत्रातील गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया – VOM इंटरनॅशनल फोरम’तर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण स्टेडियम येथे आंदोलन व उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते.   पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये पत्रकार महामंडळास निधी उपलब्ध करणे, थकीत सरकारी बिले देणे, जाहिरात ...

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव गावात बुधवारची संध्याकाळ काळ बनून आली. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि क्षणात भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला आणि त्याखाली दबून दोन निरागस चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण गावात एकच हळहळ पसरली.   मयत मुलांची नावे – 🔸 प्राप्ती किरण महाडिक (वय १०) 🔸 शिवांश किरण महाडिक (वय ४)   मुलांची आई कावेरी ...

श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २० टक्के पगारवाढ जाहीर केली असून या निर्णयामुळे समूहातील सुमारे १६,५०० हून अधिक कर्मचारी लाभार्थी ठरणार आहेत. या वाढीची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.   बोत्रेपाटील म्हणाले, “कर्मचारी हीच ओंकार शुगर ग्रुपची खरी ताकद आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच समूहाने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून ...

शिरपूर – आगामी शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्धोक पार पाडण्यासाठी आयोजित मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्ग भंडारी सभागृह, शिरपूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. या निवडणुकीसाठी एकूण 400 मतदान कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले असून यापैकी 350 कर्मचारी उपस्थित होते, तर 50 कर्मचारी गैरहजर राहिले. अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील ...

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगरच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर रामभाऊ काळाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार, माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यासभेत ही निवड पार पडली. शाळेच्या विकासाबरोबरच माजी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि नव्या उपक्रमांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काळाणे यांची निवड महत्वाची मानली जात आहे. सभेदरम्यान संघटनेच्या कार्याचा आढावा ...

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर; तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील नागरी/ग्रामीण बिगरशेती/सेवक सहकारी पतसंस्थांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ...