कर्जत | दि. १० जानेवारी २०२६
व्हॉईस ऑफ मीडियाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी कुळधरण येथील शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र माने यांची एकमताने निवड करण्यात आली. कर्जत येथील विश्रामगृहात पार पडलेल्या कर्जत तालुका कार्यकारिणी निवड बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. बैठकीस संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी, दत्तात्रय जगताप, तुळशीराम साळवे, गणेश कांबळे, मोतीराम शिंदे, मच्छिंद्र अनारसे, अफरोश पठाण, मुन्ना पठाण, सुभाष माळवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्जत तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्षपदी नानासाहेब साबळे व मोतीराम शिंदे, सचिवपदी सुनील कांबळे, सहसचिवपदी बाळासाहेब सुपेकर, खजिनदारपदी राजेंद्र घोडके, तर सल्लागारपदी अमोल शिरसागर व अशोक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
या शिवाय सहयोगी सदस्य म्हणून दत्तात्रय उकिरडे, विजय सोनवणे, विश्वास रेणुका, सचिन गुरव, अण्णासाहेब बागल व सुनील खामगळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्तात्रय जगताप यांनी सांगितले की, व्हॉईस ऑफ मीडिया ही देशभर कार्यरत असलेली पत्रकारांची एक प्रबळ व विश्वासार्ह संघटना असून आगामी काळात पत्रकारांच्या विविध समस्या, अडचणी व हक्कांसाठी संघटना प्रभावीपणे काम करणार आहे. त्यांनी संघटनेची ध्येय-धोरणे व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेची आगामी दिशा व कार्ययोजना स्पष्ट केली. यावेळी गणेश जेवरे व अशोक सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजेंद्र माने यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
