श्रीगोंदा तालुक्यातील छोट्यातील छोटी संस्था असो तीच राजकारण निवडणूक पॅनल तालुक्यातील नेते मंडळीच्या नेतृत्वा शिवाय उभे राहत नाही पण श्रीगोंदा शहराच्या विकासाला महानगरच स्वरूप देत नागरी सुविधा आणि नवनवीन योजना राबवून स्थानिक नेतृत्व उदयास आणलं ते माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. ऑगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१८ या अडीच वर्षात रस्ते,दुभाजक, पाणीपुरवठा योजना,सामाजिक केंद्र,कचरा वाहतूक वाहने ,प्रशासनावर वचक यातून नागरिकांनी स्थानिक ...
श्रीगोंदा : गेल्या वीस वर्षांपासून शहरातील घडामोडी, समस्या, संघर्ष, अडचणी आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून काम करणारे नाव म्हणजे मीरा नितीन शिंदे. पत्रकारितेच्या ध्यासातून जन्मलेली त्यांची ओळख आजही श्रीगोंदेकरांच्या मनात प्रामाणिकपणाची, निर्भीड स्वभावाची म्हणून कोरली गेली आहे. राजकारणात पाऊल टाकून अवघे दोन वर्षे झाली असतानाही, लोकसेवेची खरी ओढ त्यांच्या प्रत्येक शब्दांतून जाणवते. पत्रकारिता करत असताना अनेक ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी निर्भीडपणे लिहिले. ...
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठाम संदेश देत गौरी गणेश भोस यांनी आपल्या प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात केली आहे. “मी स्वतः काम करून घेण्यासाठी सक्षम आहे” या निर्धारपूर्ण विधानासह त्यांनी स्थानिक विकासाच्या मूलभूत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. गौरी भोस यांनी रस्ते, पाणी आणि स्वच्छता या तातडीच्या नगरविकास विषयांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जाहीर केले. शहरातील अनेक भागांत ...
श्रीगोंदा : “गेल्या आठ वर्षांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आमच्या नगरपरिषदेत अनेक नवनवीन कल्पना राबविल्या. विविध शासकीय योजनांचा वेगवान आणि प्रभावी वापर करून विकासकामे सर्वत्र पोहोचवली. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शुभांगी पोटे यांनी प्रचारादरम्यान केले. सौ. पोटे पुढे म्हणाल्या, “श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षा पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनीता संतोष खेतमाळीस यांचा प्रत्येक दिवस त्याच साधेपणाने उगवतो जसा त्यांनी आयुष्यभर जगलेला आहे. कोणतीही दिखाऊपणा नाही, कोणतेही वेगळेपण नाही… फक्त कष्ट, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजासाठी असलेली निष्ठा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनीता खेतमाळीस यांनी आयुष्यभर कष्ट आणि शिस्त यांनाच आपली ओळख बनवली. घर, संसार आणि शेतीच्या ...
श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवत श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) पदावर मयुर गोरखे यांची बिनविरोध निवड करून राजकीय वर्चस्व अधोरेखित केले. पूर्वी हे पद बबन श्रीराम यांच्याकडे होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. नव्या निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ...
जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेने भारावून गेले, कारण इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंगलेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली १७०० वी उसंतवाणी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी अर्पण केली. आध्यात्म, इतिहास, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक ...
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य, स्पर्धात्मक व रास्त दर मिळावा, वजनातील फसवणूक थांबावी आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत या उद्देशाने श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळे येथील उपबाजार आवारात भुसार मालाच्या खरेदी-विक्री लिलावास अधिकृत सुरूवात करण्यात आली. समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी ही माहिती दिली. गुरुवार व रविवार अशा आठवड्यात दोन दिवस लिलावाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनाच्या दिवशीच मका, बाजरी, गहू ...
शिरपूर – आगामी शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्धोक पार पाडण्यासाठी आयोजित मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्ग भंडारी सभागृह, शिरपूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. या निवडणुकीसाठी एकूण 400 मतदान कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले असून यापैकी 350 कर्मचारी उपस्थित होते, तर 50 कर्मचारी गैरहजर राहिले. अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील ...
राहुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप ओबीसी सेलचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस नारायण नंदकुमार धोंगडे यांच्या जनसंपर्क मोहमीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजकारणातून विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न वॉर्डात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून धोंगडे यांनी गरजू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. भोजनदान, आरोग्य सहाय्य, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग, ...









