लोकमान्य नेता “मनोहर पोटे” – राजाभाऊ लोखंडे

श्रीगोंदा तालुक्यातील छोट्यातील छोटी संस्था असो तीच राजकारण निवडणूक पॅनल तालुक्यातील नेते मंडळीच्या नेतृत्वा शिवाय उभे राहत नाही पण श्रीगोंदा शहराच्या विकासाला महानगरच स्वरूप देत नागरी सुविधा आणि नवनवीन योजना राबवून स्थानिक नेतृत्व उदयास आणलं ते माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी.

ऑगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१८ या अडीच वर्षात रस्ते,दुभाजक, पाणीपुरवठा योजना,सामाजिक केंद्र,कचरा वाहतूक वाहने ,प्रशासनावर वचक यातून नागरिकांनी स्थानिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आणि जानेवारी २०१९ मध्ये पोटे यांच्या पत्नी सौ शुभांगी ताई पोटे जनतेतून १६०० मतांच्या फरकाने नगराध्यक्ष बनल्या आणि विकासाची घोडदौड सुरूच राहिली त्यानंतर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली पुढे २,३ महिने जाताच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली नवे महायुती सरकार स्थापन झाले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर पोटे यांचे कार्य पाहत विकासनिधी दिला लागलीच कोरोना महामारी आली जनजीवन ठप्प झाले असताना विकासाचा शब्द देऊन नगराध्यक्ष खुर्ची मिळाल्याने कामे करण्याची इच्छा होती तिथे मार्ग सापडला राज्यात,जिल्ह्यात इतर नगरपालिका तुलनेत जादा विकास निधी मिळवून रोहिदास चौक ते छत्रपती शिवाजी चौक मेनरोड रस्ता कोरोना काळात केला.

 

पोटे दाम्पत्यांना लहान मुले असताना हे दाम्पत्य कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ऐवजी वर्क ऑन रोड वर होते. वाडी वस्तीचा विकास याच काळात केला मनोहर पोटे यांचा प्रभाग १ होता पण ते नगरसेवक बनले प्रभाग ४मधून (आताचा प्रभाग ७)जनतेने निवडून दिले कारण त्यांनी शब्द दिला शहर विकास केला तसा प्रभाग ४ चा विकास करू साई नगर मधील ३० वर्षापासून रखडलेले रस्ते केले,कुंभार गल्लीत दरवर्षी गणपती घेण्यासाठी मोठी गर्दी असते पण पावसाने येथील अरुंद रस्ते चिखलमय असायचे येथे सिमेंट रस्ते केले अरुंद बोळात पेविंग ब्लॉक बसवले शेजारीच रविवार पेठ आणि शनी चौकाला जोडणारा रस्ता हा मुख्य रस्ता मालवाहतूक छोटी वाहने,दुचाकीस्वारांना कसरत करत चालावे लागायचे येथे रस्त्याची दुरवस्था होती शिवाय सर्व मिरवणुका याच रस्त्याने जात येथील रस्ता सिमेंटचा केला. ओपन स्पेस डेव्हलपमेंट झाले,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक राज्यातील अनेक नगर परिषद हद्दीत झाले श्रीगोंद्यात व्हावे हि मनोहर पोटे यांचे स्वप्न होते ते याच काळात मार्गी लागले, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकचे काम बाह्यवळण (बायपास) जवळ पूर्ण केले.

 

पोटे दांपत्य दररोज नगर परिषद कार्यालयात नागरिकांच्या प्रश्न सोडविल्या हेतू हजर राहू लागले कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून कामे चालू केली आणि राजकारणातून आरोप झाले सरकार बदलले महायुती सरकार आले पण नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्या कडेच होते त्यांनी साथ दिली पुढे सहकारी सोडून गेले पण लोक बरोबर होते नियती साथ देत होती एक वेळ आली वाटल सगळ संपलं चौकशीचा ससेमिरा पाठ सोडत नव्हता पण मंत्री एकनाथ शिंदे सर्व पाहत होते कामास प्राधान्य देणाऱ्या मनोहर पोटे यांच्या कामे हातावेगळे करण्याची गती पाहत होते त्यांनी मनोहर पोटे यांना शिवसेनेत प्रवेश दिला आणखी काम कर निधी देतो असे आश्वासित केले जनता देखील पोटे यांच्या प्रलंबित कामाला मिळालेली गती पाहून खुश होती कार्यकाळ संपला पण निवडणुका लांबणीवर पडल्या दीड वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या चर्चा सुरू झाली नगराध्यक्ष कोण जनतेचा सर्व्हे होत पोटे महायुती मधील तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विरोध केला तिथे एकनाथ शिंदे म्हणाले स्वतंत्र लढ नगराध्यक्ष पद सह बहुमत मिळव मी विकास निधी कमी पडू देणार नाही आणि लोकमान्य नेतृत्वाला उमेदवार मिळाले आणि शिवसेनेचा पॅनल तयार झाला.