राहुरी नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग क्रं. ४ मध्ये नारायण धोंगडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप ओबीसी सेलचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस नारायण नंदकुमार धोंगडे यांच्या जनसंपर्क मोहमीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजकारणातून विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न वॉर्डात चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही वर्षांपासून धोंगडे यांनी गरजू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. भोजनदान, आरोग्य सहाय्य, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग, तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने केली जाणारी पाठपुरावा यामुळे त्यांची “माणुसकीसोबत सेवा” ही ओळख अधिक दृढ झाली आहे.

धोंगडे यांच्या प्रत्यक्ष जनसंपर्कामुळे नागरिकांचा विश्वास अधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक नेतृत्वाचा ठोस पाठिंबा आणि सतत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या उमेदवारीकडे वॉर्डात उत्सुकतेने पाहिले जात आहे. विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, रस्ते–गटारासह मूलभूत सुविधा सुधारण्याचे नियोजन, तसेच तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याची त्यांची तयारी नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करत आहे.

प्रभाग क्रमांक ४ मधील मतदारांनी व्यक्त केलेली अपेक्षा स्पष्ट आहे. “जमिनीवर उतरणारा, उपलब्ध राहणारा आणि नागरिकांसाठी कार्य करणारा प्रतिनिधी हवा.” या पार्श्वभूमीवर नारायण धोंगडे यांची छबी अधिक मजबूत होत असून त्यांच्या प्रवेशामुळे वॉर्डातील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ४ मध्ये धोंगडे यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद भाजपसाठी उत्साहवर्धक ठरत आहे.