श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या तब्बल १६० मावळ्यांनी कोयना धरणातील सर्वात उंच बेट किल्ला वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकजण ज्या भावनेने एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच प्रेरणेने मावळ्यांनी ‘मी अवयव दान व रक्तदान करणार’ अशी हृदयस्पर्शी शपथ घेतली. शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या काठी बामनोली येथे कॅम्पिंग करण्यात आले. रविवारी सकाळी ४५ मिनिटांच्या जलप्रवासानंतर सर्व ...
श्रीगोंदा : गौरी शुगरने चालू गाळप हंगामात दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. देवदैठण येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिटमुळे गाळप क्षमतेत वाढ झाली असून, या हंगामासाठी तब्बल दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३२०० रुपये भाव जाहीर ...
श्रीगोंदा : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., श्रीगोंदा यांच्या घारगाव शाखेकडून दि. ०४ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. भास्कर आश्रू निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदा) यांना ३ लाख रुपये कर्ज देण्यात आले होते. कर्जफेडीसाठी निंभोरे यांनी संस्थेला धनादेश दिला. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे तो धनादेश बँकेत अनादरित झाला. या प्रकरणी संस्थेने श्रीगोंदा न्यायालयात दाद मागितली होती. संबंधित ...
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे 2009 सालच्या बारावी कला बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे जाज्वल्य उदाहरण घालत 117 पुस्तकांची मूल्यवान भेट दिली. अंदाजे 20,000 रुपयांच्या किंमतीची ही पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयाला सप्रेम अर्पण करण्यात आली असून, ग्रंथालय समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे. या उपक्रमात किशोर गुंजाळ, ...
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने गेल्या एका वर्षात घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम ...
महाराष्ट्रातील दगडी पायऱ्यांच्या ऐतिहासिक बारवांचा वारसा जतन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’ ला आज नवसंजीवनी मिळाली आहे. मोहिमेचे राज्य मुख्य समन्वयक रोहन काळे (मुंबई) यांनी अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नियुक्तीची घोषणा करताच जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजेश इंगळे हे उत्तम गडकिल्ले ट्रेकर, वारसा अभ्यासक, संवर्धक आणि “किल्ले दाखविणारा माणूस” म्हणून ...
श्रीगोंदा – नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रांबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. निवडणूक विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 79.84% मतदान झाले आहे. बहुचर्चित श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. शहरातील ३२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला दिसला. ...
सह्याद्रीच्या कठीण घनदाट अरण्यात, कोयना–जावळीच्या गभीर खोऱ्यात वसलेला वासोटा किल्ला अलीकडेच इतिहासप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या ९६व्या गडकिल्ले मोहिमेद्वारे पानिपत वीरांच्या वारसा संवर्धनासाठीची ‘एक सही’ मोहीम अभिमानाने पार पडली. अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत ५२ शिलेदारांनी सहभाग घेतला. वासोटाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निष्ठेने गडपूजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे आपली स्वाक्षरी करून पानिपत वीरांचा इतिहास ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- गेल्या साडेसात वर्षांत राबवलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनेलला नगराध्यक्ष पदा सह सर्व २२ जागांवर विजय मिळवून द्या, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेत केले. पोटे म्हणाले, “उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत श्रीगोंद्याचा विकास जिल्ह्यात नावलौकिक निर्माण करणारा ...
श्रीगोंदा – स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आकार घेत असताना अपक्ष उमेदवार आणि भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयश्री कोथिंबीरे यांनी शिवसेना उमेदवारांना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र “भाजप प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य मान देण्यात कमी पडते” असे म्हणत त्यांनी शिवसेना उमेदवार भामाताई कोथिंबीरे आणि बाबू धुमाळ ...









