श्रीगोंदा(प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या शुभारंभ प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी माझ्या मास्क वापरण्यावर टीका केली खरे तर पॅनल शुभारंभ प्रसंगी नोव्हेंबर २०१९ ते नगर पालिका कार्यकाळ संपे पर्यंत तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगर परिषद साठी किती निधी मिळवून दिला. याची माहिती ते देतील तसेच भविष्यात किती निधी देतील याची उत्सुकता म्हणून नागरिक जमले होते. आम्हालाही याचीच अपेक्षा होती. पण निधीच दिला नाही तर काय बोलणार अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मास्क बाबत बोलताना पोटे यांनी वातावरणातील बदलाने त्रास जाणवू लागल्याने औषधोपचार चालू असून धावपळ होत असल्याने डॉक्टरांनी मला मास्क वापारण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट केले.
पोटे म्हणाले ३३ कोटींच्या रस्त्यावरून मला लक्ष्य केले जाते. पण सदर कामाचे टेंडर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सल्ल्याने झाले. मी त्यांच्या गटात होतो कार्यकर्ते रुपी ठेकेदार जगवण्या साठी त्यांच्याच जवळच्या ठेकेदारांना कामे दिली त्या खराब कामांना तेच जबाबदार असल्याचा आरोप पोटे यांनी केला.
अविश्वास ठराव बाबत बोलताना पोटे म्हणाले, पालिकेत नगराध्यक्ष आमच्या पक्षाचे पण परिषदेत बहुमत भाजपचे होते. सर्व ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यावर साडेतीन वर्षे एकत्र ठराव मंजूर केल्यावर एका रात्रीत विरोधी ११आणि आमच्या ८ पैकी ६ नगरसेवकांना कोणता साक्षात्कार झाला त्यांनी कोणी आमच्यापासून फोडले ते कसे शिवसेनेत गेले यामागील सूत्रधार कोण हे नागरिकांना माहीत आहे.
महा विकास आघाडी उमेदवार सौ.गौरी भोस यांनी प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष झाल्यास स्वतः कारभार पाहण्यासाठी सक्षम असून नगराध्यक्ष खुर्ची शेजारी मार्गदर्शनाला पतीची खुर्ची नसेल अशी टीका केल्याचे सांगता पोटे म्हणाले मी नगराध्यक्ष शेजारी खुर्चीवर बसत होतो. कारण मी नगरसेवक आणि गटनेता होता पत्नी सौ.शुभांगी पोटे या जनतेतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या होत्या. भोस यांना त्यांचे पती मार्गदर्शन करणार नाहीत कारण त्यांचे पती गणेश भोस दोनवेळा नगरसेवक होते. मीटिंग २,३ तास चालली तर ते सलग बसू शकत नव्हते अशी टीका केली.
घोडेगाव रोडवरील रस्ता दुभाजकातील सिमेंट विरघळले, कठडे पडले अशी टीका आमदार विक्रम पाचपुते यांनी पोटे यांच्यावर केल्याचे विचारता पोटे म्हणाले सदर रस्त्याचे काम पाचपुते यांच्या जवळच्याच ठेकेदाराने केले याला ८,९ वर्षाचा काळ लोटला इतके मागे बघताना आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्या शेजारीच पहावे प्रचार शुभारंभास त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ते आदरणीय दोबोले ठेकेदार यांनीच ते काम केले आहे तेच त्याचा खुलासा करतील अशी खोचक टीका केली.
