श्रीगोंदा शहरात शिवसेनेच्या भव्य रॅलीनंतर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत शहराच्या राजकीय वातावरणाला वेगळी दिशा देणारी भाषणे झाली. सभेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी मनोहारक भाषण करत शिवसेनेच्या विजयशिल पॅनेलची घोषणा केल्यासारखीच आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली.
लोखंडे म्हणाले, “मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे हे श्रीगोंदा शहराची अस्मिता आहेत. गेल्या साडेसात वर्षांत पोटे दांपत्याने शहराच्या विकासाचा वेग वाढवला, नवनवीन योजना राबवून शहराचा चेहरा बदलला. आज नागरिक मनोहर पोटेंच्या कामावर खूश असून शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.”
ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीत चार पॅनल रिंगणात आहेत; मात्र विरोधातील तीनही पॅनलचे नेतृत्व शहराबाहेरील आहे. शहराच्या विकासाला अडथळा आणण्यासाठीच हा विरोधाचा डाव आहे. नागरिकांनी हे समीकरण ओळखले असून शिवसेनेलाच मतदानाचा कौल मिळेल.”
शिवसैनिकांनी मतदान होईपर्यंत प्रचारात पूर्ण ताकदीने उतरावे, असेही आवाहन त्यांनी केले.
“रॅलीचा जनसमुदाय हा शिवसेनेच्या विजयाचा पहिला शंखनाद” – अनिल शिंदे
शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल शिंदे यांनी रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा उल्लेख करत ही निवडणूक शिवसेना जिंकणार याची खात्री व्यक्त केली.
“शहरात केलेला विकासच आमचा प्रचार” – मनोहर पोटे
मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे भाषणात म्हणाले, “शहराने स्थानिक नेतृत्व स्वीकारले आहे कारण आम्ही काम केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यामुळे श्रीगोंद्यात मोठा निधी आला. आगामी काळातही श्रीगोंद्यासाठी विशेष निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.”पुढे ते म्हणाले की पॅनलमध्ये शहर विकासाची तळमळ असणाऱ्या, अनुभवी आणि नवे उत्साही चेहरे घेतले असून सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, अशी आशा आहे.
मतदान जागरूकतेवर भर – दिलीप सातपुते
भाजणीत दिलीप सातपुते यांनी पोस्टल मतदान आणि समर्थकांच्या मतदाना बाबत कार्यकर्त्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातून शिवसेनेची भव्य रॅली काढण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही पहिलीच मोठी शक्ति प्रदर्शन रॅली असून याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रॅली व सभेला उमेदवार सौ. शुभांगी ताई पोटे, सर्व पॅनल उमेदवार, संपर्क प्रमुख सचिन जाधव, तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, टिळक भोस आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
