शिवाई देवीच्या साक्षीने १०० वी मोहिम अर्पण; ११३ शिवप्रेमींची प्रेरणादायी उपस्थिती श्रीगोंदा | दि. १७ मार्च २०२६ गणेश कविटकर जुन्नरच्या पवित्र भूमीत वसलेल्या किल्ले शिवनेरी या शिवजन्मभूमीवर रविवारी इतिहासाचा एक अभिमानास्पद क्षण साकार झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने आपल्या ट्रेकिंग प्रवासातील १०० वी मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करत ट्रेकिंग विश्वात शतकिय उंची गाठली. या ऐतिहासिक मोहिमेत तब्बल ११३ शिवप्रेमी सदस्यांनी उत्साहाने सहभाग ...

दरवाढ तात्काळ मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा   श्रीगोंदा | दि. 13 मार्च 2026 गणेश कविटकर   श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शासनाने केलेल्या वाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध ...

महिलांचा पुढाकार; गावात शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड, स्वच्छतेसाठीही ठोस निर्णय श्रीगोंदा | दि. 08 मार्च 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेत गावात ‘शिवीबंदी’चा ठराव मंजूर केला. गावात कोणीही आई – बहिणींवरून शिवीगाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष महिला ग्रामसभेत ...

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; शिस्तप्रिय दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष. कोंभळी|दि. 06 मार्च 2026 गणेश कविटकर कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र कोंभळी येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्याने परिसरात भक्तीचा उत्सवच निर्माण झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरेल निनादात आणि नाथ महाराज्यांच्या घोषणांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या ...

आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा असं म्हटलं जातं की तरुण पिढीला आपल्या आजी-आजोबांसाठी वेळ नसतो… पण या समजुतीला छेद देत नातवंडांच्या अपार प्रेमाने आणि कृतज्ञतेने उजळलेला एक भावस्पर्शी सोहळा अनुभवायला मिळाला. ज्या हातांनी संस्कार दिले, ज्या डोळ्यांनी पिढ्या घडताना पाहिल्या, त्या पूज्य व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी नातवंडांनी एकत्र येत उभा केलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला. श्री ..रुस्तुम फकीरबुवा महानुभाव ...

कोंभळी |दि . ०२ मार्च २०२६ गणेश कविटकर   ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ वे वर्ष   कोंभळी : अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात ...

छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी प्रवास : किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड श्रीगोंदा | दि. 21 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पराक्रम, त्याग आणि धर्मनिष्ठेची साक्ष देणाऱ्या भूमीतून यंदा पुन्हा एकदा धर्मवीरांचा जयघोष दुमदुमला. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने ...

श्रीगोंदा | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   अग्नीपंख फौंडेशनचा स्व. अजित पवार यांना अनोखा श्रद्धांजलीपर उपक्रम……   श्रीगोंदा : लहानग्यांच्या छोट्याशा मुठीत किती मोठी ताकद असते, याचा प्रत्यय श्रीगोंद्यात पुन्हा एकदा आला. “एक मुठ धान्य अनाथांसाठी” या अग्नीपंख फौंडेशनच्या उपक्रमातून तब्बल १५ मेट्रिक टन धान्याचा साठा उभा राहिला. स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना मानवंदना देत हा उपक्रम राबविण्यात ...

श्रीगोंदा  | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर, श्रीगोंदा परिसरात भक्तिरसाचा वर्षाव; हजारो भाविकांची उपस्थिती   श्रीगोंदा : तालुक्याचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत परंपरेतील महान संत श्री.संत शेख महंमद महाराज यांच्या ३२७ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा नगरी सध्या अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संजीवनी समाधी सोहळा व यात्रा महोत्सवाच्या पावन ...

श्रीगोंदा | दि. १९ फेब्रुवारी २०१६  गणेश कविटकर   पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारव दीपोत्सव – पाचवे वर्ष उत्साहात साजरे   श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर परिसर श्रीगोंदा, काशीबारव (मांडवगण रोड) व बेलवंडी ...