श्रीगोंदा | दि. 06 एप्रिल 2026 गणेश कविटकर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संगठन सृजन अभियान अंतर्गत श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नियुक्त निरीक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी देत असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीस मुख्य निरीक्षक सरत राऊट, ज्येष्ठ नेते ...
श्रीगोंदा | दि. 31 मार्च 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा शहर व परिसरातील अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, वीज वितरणात अन्यायकारक पद्धत राबवली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या वेळी उपजिल्हा प्रमुख मनोहर पोटे, तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, गटनेते बाबुशेठ धुमाळ ...
श्रीगोंदा | दि. 27 मार्च 2026 गणेश कविटकर शेतकरी सभासदांनी आपल्या नावावर असलेली दीर्घ मुदत, मध्यम मुदत तसेच पशुपालन कर्जाची थकबाकी ३१ मार्चपूर्वी भरून शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागवडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने कर्जदार ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- कष्टकरी, छोटे व्यापारी आणि महिला बचत गटातील महिलांच्या आशीर्वादातून उभा राहिलेला वेदराज डेव्हलपर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभू श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवारी वेदराज डेव्हलपर्सच्या ५१ व्यावसायिक गाळे व ३४ निवासी फ्लॅट्सच्या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उत्साहात ...
मुंबई | दि 24 मार्च 2026 गणेश कविटकर महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या पर्यटन विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले. तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या प्रचंड क्षमतेचा योग्य वापर करून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी धर्मवीर ...
कर्जत | दि. 20 मार्च 2026 गणेश कविटकर कोंभळी (ता. कर्जत) : ॐ चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त गावात भव्य कीर्तन महोत्सव व नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. ...
श्रीगोंदा | दि.19 मार्च 2016 गणेश कविटकर श्रीगोंदा : हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडवा निमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीने श्रीगोंदा येथे भव्य, दिमाखदार व शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत हजारो अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली. श्रीगोंद्यासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा व कर्नाटक या ...
श्रीगोंदा | दि. 19 मार्च 2026 गणेश कविटकर हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी आणि पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर आयोजित करण्यात आलेला बलिदान सप्ताह अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर शंभू भक्तीने ...
३१ मार्च २०२६ पर्यंत संधी; मालमत्ता कर थकबाकीदारांनी लाभ घ्यावा श्रीगोंदा | दि. १९ मार्च २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नगरपरिषदेकडून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकित मालमत्ता कराच्या रकमेवरील दंड व शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी विहित ...
पेडगाव (ता. श्रीगोंदा) | दि. १७ मार्च २०२६ गणेश कविटकर हिंदवी स्वराज्याचे शूर, धर्मरक्षक आणि अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्यासाठी पेढगाव येथे ‘बलिदान सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने १७ ते १८ मार्च २०२६ दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या ...









