श्रीगोंद्यात काँग्रेसचे ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत आढावा बैठक संपन्न

श्रीगोंदा | दि. 06 एप्रिल 2026

गणेश कविटकर

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संगठन सृजन अभियान अंतर्गत श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नियुक्त निरीक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी देत असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आहेत.

या बैठकीस मुख्य निरीक्षक सरत राऊट, ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच आमदार हेमंत तात्या ओगले यांचे मार्गदर्शनाखाली यावेळी तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, तसेच आगामी राजकीय धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्यासह श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोईटे, शहराध्यक्ष अ‍ॅड. समित बोरुडे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा सुनिता दरोडे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास काळे, तसेच शहर कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर मालजप्ते उपस्थित होते.

याशिवाय सचिन गायकवाड, डॉ. गोरख बायकर, शहाजी पाटील, महेश दरेकर, भाऊ डांगे, सोहेल शेख, राम घोडके, गोवर्धन कारले, प्रवीण ढगे, सुरज शेख, योगेश शेळके, ओमकार लोखंडे, ओंकार उदमले, आशुतोष साळुंखे, संदीप वागस्कर, शंकर कोठारी, तात्यासाहेब घोडके, आकाश लबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, फ्रन्टल संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी गावपातळीपासून ते तालुकास्तरापर्यंत नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीस गती देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.