श्रीगोंदा(प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या शुभारंभ प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी माझ्या मास्क वापरण्यावर टीका केली खरे तर पॅनल शुभारंभ प्रसंगी नोव्हेंबर २०१९ ते नगर पालिका कार्यकाळ संपे पर्यंत तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगर परिषद साठी किती निधी मिळवून दिला. याची माहिती ते देतील तसेच भविष्यात किती निधी देतील याची उत्सुकता म्हणून नागरिक जमले होते. आम्हालाही याचीच अपेक्षा ...

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील वातावरणात सकारात्मकतेची नवी ऊर्जा जाणवत आहे. प्रभागनिहाय दौरे, नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि शहराच्या विकासाबाबतची व्यापक दृष्टी या सर्वांमुळे सौ. भोस यांच्या प्रचाराला लक्षणीय गती मिळाली आहे.   प्रचारसभांमध्ये सौ. भोस यांनी श्रीगोंदासाठी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहराचा आराखडा ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद शहरातील जनमत कोणत्या दिशेने झुकत आहे, याची स्पष्ट जाणीव करून देणारा ठरत आहे.   गेल्या काही काळात संवादाचा अभाव, मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे शहराचा विकास ज्या गतीने व्हायला हवा होता, त्या गतीने झाला नाही. हा सर्व अनुभव डोळ्यासमोर ठेवत ...

श्रीगोंदा शहरात शिवसेनेच्या भव्य रॅलीनंतर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत शहराच्या राजकीय वातावरणाला वेगळी दिशा देणारी भाषणे झाली. सभेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी मनोहारक भाषण करत शिवसेनेच्या विजयशिल पॅनेलची घोषणा केल्यासारखीच आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली.   लोखंडे म्हणाले, “मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे हे श्रीगोंदा शहराची अस्मिता आहेत. गेल्या साडेसात वर्षांत पोटे दांपत्याने शहराच्या विकासाचा वेग वाढवला, नवनवीन ...

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदासाठी आज (सोमवार, दि. 24) पार पडलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक घेण्यात आली.   याआधी सकाळी ९ वाजता नगर येथील राज पॅलेसमध्ये संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचे समजते. या बैठकीतच अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब ...

श्रीगोंदा तालुक्यातील छोट्यातील छोटी संस्था असो तीच राजकारण निवडणूक पॅनल तालुक्यातील नेते मंडळीच्या नेतृत्वा शिवाय उभे राहत नाही पण श्रीगोंदा शहराच्या विकासाला महानगरच स्वरूप देत नागरी सुविधा आणि नवनवीन योजना राबवून स्थानिक नेतृत्व उदयास आणलं ते माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. ऑगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१८ या अडीच वर्षात रस्ते,दुभाजक, पाणीपुरवठा योजना,सामाजिक केंद्र,कचरा वाहतूक वाहने ,प्रशासनावर वचक यातून नागरिकांनी स्थानिक ...

श्रीगोंदा : गेल्या वीस वर्षांपासून शहरातील घडामोडी, समस्या, संघर्ष, अडचणी आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून काम करणारे नाव म्हणजे मीरा नितीन शिंदे. पत्रकारितेच्या ध्यासातून जन्मलेली त्यांची ओळख आजही श्रीगोंदेकरांच्या मनात प्रामाणिकपणाची, निर्भीड स्वभावाची म्हणून कोरली गेली आहे. राजकारणात पाऊल टाकून अवघे दोन वर्षे झाली असतानाही, लोकसेवेची खरी ओढ त्यांच्या प्रत्येक शब्दांतून जाणवते. पत्रकारिता करत असताना अनेक ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी निर्भीडपणे लिहिले. ...

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठाम संदेश देत गौरी गणेश भोस यांनी आपल्या प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात केली आहे. “मी स्वतः काम करून घेण्यासाठी सक्षम आहे” या निर्धारपूर्ण विधानासह त्यांनी स्थानिक विकासाच्या मूलभूत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.   गौरी भोस यांनी रस्ते, पाणी आणि स्वच्छता या तातडीच्या नगरविकास विषयांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जाहीर केले. शहरातील अनेक भागांत ...

श्रीगोंदा : “गेल्या आठ वर्षांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आमच्या नगरपरिषदेत अनेक नवनवीन कल्पना राबविल्या. विविध शासकीय योजनांचा वेगवान आणि प्रभावी वापर करून विकासकामे सर्वत्र पोहोचवली. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शुभांगी पोटे यांनी प्रचारादरम्यान केले.   सौ. पोटे पुढे म्हणाल्या, “श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षा पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनीता संतोष खेतमाळीस यांचा प्रत्येक दिवस त्याच साधेपणाने उगवतो जसा त्यांनी आयुष्यभर जगलेला आहे. कोणतीही दिखाऊपणा नाही, कोणतेही वेगळेपण नाही… फक्त कष्ट, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजासाठी असलेली निष्ठा.   शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनीता खेतमाळीस यांनी आयुष्यभर कष्ट आणि शिस्त यांनाच आपली ओळख बनवली. घर, संसार आणि शेतीच्या ...