लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना….   श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...

श्रीगोंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२ पैकी तब्बल १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सुनिता खेतमाळीस यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या शुभांगी पोटे यांचा १,०३७ मतांनी पराभव करत विजयी झेंडा फडकावला. या निकालामुळे भाजपने नगरपालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक व्यवस्थापन, योग्य उमेदवार निवड ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ११ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, श्रीगोंदा येथे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग क्रमांक ७ ब मधील मतदान प्रक्रिया ...

श्रीगोंदा : प्रभाग क्रमांक ७ ब मधील निवडणूक प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष व नगरसेवक असताना लक्ष्मी नगर, इंदिरा नगर, हनुमान नगर, साई नगर, रविवार पेठ व कुंभारगल्ली येथील रस्ते तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटची महत्त्वपूर्ण कामे केल्याची माहिती मतदारांना दिल्यानंतर, आमदार विक्रम पाचपुते यांनी सदर कामे आपणच केल्याचा दावा प्रसारमाध्यमांत केल्याने माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यावर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. ...

‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.  त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी ...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खात्यामार्फत राज्यभर सुरू असलेल्या वेगवान विकासकामांचा थेट लाभ श्रीगोंदा शहराला मिळत असून, शहरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडून येत आहेत. या विकासकामांच्या जोरावर शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.   जुना प्रभाग क्रमांक ४ (सध्याचा प्रभाग क्रमांक ७) येथे नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कार्यरत असताना रस्ते, गटारी, नागरी सुविधा आदी मूलभूत ...

•९० हजार ब्रास जादा उत्खनन • कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश   नागपूर, दि. १२ डिसेंबर २५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. ...

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने गेल्या एका वर्षात घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम ...