कर्जत तालुका – शिलालेख वाचन भाग १ गुरव पिंपरी येथे १६६४ सालातील मंदिर जीर्णोद्धाराची नोंद उजेडात… महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील सामाजिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी येथे आढळून आला आहे. या शिलालेखाचे वाचन पुण्याचे प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले असून संशोधन राजेश पोपट ...
दि. 04 जून 2026 गणेश कविटकर शिलालेखांतून घडते भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन श्रीगोंदा : इतिहास हा केवळ ग्रंथांच्या पानांतच नसतो, तर तो आपल्या गावोगावी विखुरलेल्या वारसा स्थळांमध्ये, मंदिरांच्या भिंतींवर, बारवांच्या कडांवर, समाधींवर आणि शिलालेखांमध्ये जिवंत स्वरूपात कोरलेला असतो. अशाच दुर्लक्षित पण अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती महत्त्वपूर्ण कार्य ...
दि. 03 जून 2026 गणेश कविटकर देशाचे संरक्षण करणारे सैनिक, समाजाला दिशा देणारे शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच भावनेतून लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व अग्नीपंख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान, शिक्षक, अधिकारी तसेच नुकतेच सैन्यदलात भरती झालेल्या जवानांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ...
दि. 03 जून 2026 गणेश कविटकर जागतिक सायकल दिन विशेष…. “जागतिक सायकल दिनानिमित्त साधेपणा, संघर्ष आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश” काळ बदलला… माणसांच्या गरजा बदलल्या… वाहतुकीची साधने बदलली. पण आजही गावातील एखाद्या धुळीच्या रस्त्यावरून घंटी वाजवत जाणारी सायकल दिसली की मन नकळत भूतकाळात हरवून जाते. अनेकांच्या आयुष्यातील पहिली गाडी म्हणजे सायकल. अनेकांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवातही याच दोन चाकांपासून ...
श्रीगोंदा | दि. 27 मे 2026 गणेश कविटकर मांडवगण-श्रीगोंदा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, परिसरातील ऐतिहासिक व पुरातन “काशीबारव” सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. वारसा संवर्धनासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जनजागृती, पाठपुरावा आणि संघर्षाला अखेर यश मिळाल्याने इतिहासप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काशीबारव परिसरात पुन्हा रस्ता खोदकाम सुरू झाल्यानंतर बारवेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात ...
भागवत धर्माचा निष्ठावंत वारकरी, संगीतसेवेचा अखंड दीप मालवला अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता. २३) वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदाय आणि संगीत क्षेत्राने एक अभ्यासू, सेवाभावी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ...
लोणी व्यंकनाथमध्ये वाढदिवस साजरा झाला समाजहिताच्या संकल्पांनी; विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रामस्थ भारावले श्रीगोंदा : दि. 26 मे 2026 गणेश कविटकर आजच्या दिखाऊ आणि खर्चिक वाढदिवसांच्या काळात लोणी व्यंकनाथ येथे एका वाढदिवसाने समाजासमोर आदर्श निर्माण केला. जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त “जागर युवा प्रतिष्ठान” या सामाजिक संघटनेचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. हा सोहळा केवळ ...
विसापूर : दि. 25 मे 2026 गणेश कविटकर “दत्तात्रय गावडे गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर महेश्वर पतसंस्था व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थेने १७ शाखांचा विस्तार करत तब्बल ३४० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी विश्वासपात्र आणि सर्वसामान्यांच्या हिताची आहे,” असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काढले. विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट ...
आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत रामदास झेंडे मित्रमंडळाचा समाजाला आदर्श संदेश श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर आयुष्यभर कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला देणाऱ्या ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. माता लिलाबाई झेंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास झेंडे मित्रमंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील तब्बल १६३ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या ...
UPSC मधून केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती; रेसिडेन्शियल हायस्कूलतर्फे विशेष गौरव श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर अहिल्यानगर : “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या सुविधा किंवा आर्थिक बळाची गरज नसते; जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झालेले महेश ...









