नाशिक | दि. २० जुलै २०२६   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दर्जेदार तयारी करता यावी, त्यांच्या ज्ञानाचा पाया अधिक भक्कम व्हावा आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी यशाची शिखरे गाठावीत, या उदात्त हेतूने कै. पुंजाजी ढिकले पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्ध पिंपरी येथील स्व. कमल उत्तमराव ढिकले अभ्यासिकेला यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संदर्भातील अनेक पुस्तके प्रदान करण्यात ...

श्रीगोंदा | १९ जुलै २०२६   श्रीगोंद्याकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटोदा (ता. जामखेड) परिसरात घडली. या घटनेने श्रीगोंदा तहसील कार्यालयासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, खोदलेल्या रस्त्यांवरील अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार ...

श्रीगोंदा : दि. १६ जुलै २०२६ गणेश कविटकर   अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणास्थान असलेले श्री. संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी उत्सव सोहळ्याचे बुधवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संतांच्या समता, बंधुभाव आणि मानवतेच्या शिकवणीचा संदेश देणाऱ्या या पालखी सोहळ्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मता आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडविले. यंदा या पालखी ...

श्रीगोंदा | दि. ०७ जुलै २०२६ गणेश कविटकर   “मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठे वय लागत नाही; लागते ती फक्त जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास.” या विचाराला साकार रूप देत श्रीगोंदा तालुक्यातील चिमुकली खेळाडू कु. आर्वी विशाल आढाव हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे ३ ते ...

श्रीगोंदा| दि. ०६ जुलै २०२६ गणेश कविटकर   “शिक्षण हीच खरी संपत्ती” या विचाराला कृतीची जोड देत अग्नीपंख फाउंडेशनने ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरजू व उपेक्षित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. ज्या विद्यालयात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे, अशा संत ज्ञानेश्वर विद्यालयात ...

रात्रीच्या अंधारात बसची वाट पाहणाऱ्या दोन तरुणींना स्वतःच्या वाहनातून सुखरूप घरी पोहोचवत खासदार निलेश लंके यांनी जिंकली जनतेची मने श्रीगोंदा |दि. ०६ जुलै २०२६ गणेश कविटकर रात्र गडद होत चालली होती… बसस्थानकावर दोन तरुणी चिंताग्रस्त नजरेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहत होत्या. घर गाठण्याची ओढ, सुरक्षिततेची चिंता आणि बस कधी येईल याची अनिश्चितता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अशाच वेळी ...

दररोज सुरू राहणार बाजार समिती; शेतकरी, व्यापारी आणि मत्स्य व्यवसायिकांना मोठा दिलासा. श्रीगोंदा | दि. ०३ जुलै २०२६ गणेश कविटकर   श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शासनाच्या मंजुरीनंतर अवघ्या सहा महिन्यांत कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार प्रत्यक्ष कार्यान्वित होत असून, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले आधुनिक मच्छी मार्केट येथे सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. बाजार समितीचे ...

श्रीगोंदा | दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर   तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे B.Sc. Artificial Intelligence & Machine Learning (AI & ML), B.Sc. Data Science या नव्या पदवी अभ्यासक्रमांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन B.Sc. Computer Science अभ्यासक्रमाच्या ...

श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर   श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी शिवारात अलिशान कारमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील काही संशयित अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे ...

राष्ट्रीय कृषी दिन विशेष…. श्रीगोंदा : दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर   पहाटेच्या अंधारात जग झोपेत असते; पण शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात तेव्हाच झालेली असते. त्याच्या पायाखाली ओलसर माती, डोक्यावर निळे आभाळ आणि मनात एकच ध्यास “देशातील कोणाच्याही ताटात अन्न कमी पडू नये.” हा ध्यासच भारताच्या कृषी संस्कृतीचा खरा आत्मा आहे. आज राष्ट्रीय कृषी दिन. हा दिवस केवळ शुभेच्छांचा नाही, ...