श्रीगोंदा | दि. २७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   नागरिकांची गैरसोय दूर करून दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि एकाच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत असलेले मुद्रांक विक्रेते आता दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) कार्यालयाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी वेगळ्या ठिकाणी ...

अहिल्यानगर, दि. २७ : राष्ट्रभक्तीचा हुंकार, भक्तीचा महासागर आणि एकजुटीचा अभूतपूर्व संगम असा ऐतिहासिक क्षण श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे अनुभवायला मिळाला. संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २५ ऑगस्ट रोजी तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनातून साकारलेल्या ...

पुणे | दि. २७ ऑगस्ट २०२६   ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नव्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा ...

नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयाने हाहाकार; ३५० हून अधिक मृत, १,३०० पेक्षा अधिक बेपत्ता; युद्धपातळीवर बचावकार्य     काठमांडू : हिमालयातील हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर आलेल्या महाभयंकर अचानक पुरामुळे नेपाळ आणि तिबेट सीमेवरील परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. पाणी, चिखल, दगड आणि मलब्याच्या प्रचंड लोंढ्याने गावे, घरे, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्प वाहून गेले असून नेपाळ व तिबेटमध्ये मिळून ३५० हून अधिक ...

आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वगुणांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक; श्रीगोंदकरांना केले भावनिक आवाहन   श्रीगोंदा |दि. २० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   “आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीगोंदकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विक्रमला सुट्टी द्यावी,” असे आवाहन भाजपा ...

सलग आठव्या वर्षी प्लॅस्टिक स्वच्छता मोहिम; ८ तालुक्यांतील शिवदुर्ग मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   श्रीगोंदा | दि. १९ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये इतिहास, निसर्ग, साहस आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवत महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची १०५ वी मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य अनुभवत भोरगिरी ते भीमाशंकर या सुमारे आठ ...

श्रीगोंदा : दि. १५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगडावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला आणि स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागवली. राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक तसेच श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे व नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...

७०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती, दरमहा १५० ते ३०० तक्रारी; ८० टक्के प्रश्न मार्गी लागल्याचा दावा, आता ९० टक्क्यांचे लक्ष्य…   श्रीगोंदा | दि. ०८ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी केवळ आश्वासने न देता प्रशासनाला थेट नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणून श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी २०२५ पासून सुरू केलेल्या जनता दरबाराने तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण ...

व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा, पोलिसांसाठी व्यापाऱ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरा देण्याचा निर्णय श्रीगोंदा | दि. ०७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, कानठळ्या बसविणारे बँड, रात्री उशिरापर्यंत होणारा फटाक्यांचा आवाज आणि सायलेन्सरमध्ये बदल करून धावणाऱ्या बुलेटचा कर्कश ...