श्रीगोंदा (प्रतिनिधी):-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महान उद्योजक रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंध उद्योजक भावेश भाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त अग्नीपंख फाउंडेशन, श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा ते नायगाव अशी तब्बल १३७ किलोमीटरची ‘प्रेरणा सायकल वारी’ उत्साहात पार पडली.
या उपक्रमाचा समारोप नायगाव येथे करण्यात आला. यावेळी उद्योजक व महिला खेळाडूंचा सन्मान, तसेच ‘उद्योग विश्वातील रिअल हिरो’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विद्यालयातील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा सन्मान पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे व उद्योजक भावेश भाटिया यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी बोलताना पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या,
“पद्मश्री पुरस्कारानंतर अग्नीपंख फाउंडेशनने पोपेरेवाडी येथील शाळा डिजिटल करून माझा सन्मान केला. त्या शाळेतील आठवणी आजही मनात जिवंत आहेत. मानवी आरोग्य आणि शेतीच्या भविष्यासाठी काळी माती व गावरान बियाण्यांचे जतन अत्यंत आवश्यक आहे.”
उद्योजक भावेश भाटिया म्हणाले,
“भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अग्नीपंख फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी व खेळाडूंसाठी सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. मुलांमध्ये उद्योगाची बीजे शालेय जीवनातच पेरली पाहिजेत.”
बाबुराव बोत्रेपाटील यांनी सांगितले,
“मराठी माणसाने उद्योगात उतरायचे धाडस केले तर तो नक्कीच यशस्वी होईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले. यावेळी प्रकाश कुतवळ, राजाराम शिंदे, नवनाथ मोहन दरेकर, प्रमोद दिवटे, प्रशांत धुमाळ यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास तहसीलदार सुरेखा ढोले, निता भाटीया, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, गहिनीनाथ ढवळे, प्रा. संजय लाकूडझोडे, मोहन आढाव, सुनील अनभुले, स्वाती जमदाडे, अविनाश वाडकर, सिद्धू नेवसे, भाऊसाहेब वाघ, ॲड. कावेरी गुरसल, राजकुमार इथापे, किसन वर्हाडे, मारुती वागस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनाथ खामकर यांनी मानले.
सन्मानित उद्योजक व खेळाडू
बबनराव शेळके, बाबुराव बोत्रेपाटील, प्रकाश कुतवळ, संजय उंडे, बाळकृष्ण पानसरे, प्रताप पवार, सोमनाथ होळकर, अंकुश घाडगे, प्रमोद दिवटे, दत्तात्रय मेहत्रे, नवनाथ दरेकर, राहुल शेलार, सतीश मचे, आनंद जगदाळे, बंडू पवार, विजया गाडीलकर, संतोष नागवडे, चंद्रकांत चौधरी, मयूर गोरखे, प्रांजली धुमाळ, सिद्धी शिर्के (महिला खेळाडू), तसेच सायकलपटू विजय जगदाळे, रमेश सांळुके, संकेत गांजुरे, विजया लंके व अनिकेत वाबळे यांचा गौरव करण्यात आला.
ही सायकल वारी उद्योजकता, शिक्षण, पर्यावरण व प्रेरणेचा संदेश देणारा दीपस्तंभ ठरली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
