उपजिल्हाधिकारी जितेंद्र इंगळे यांचा खांडगाव तरुणांच्या वतीने नागरी सत्कार, आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते गौरव; ५१ कर्तबगार तरुणांचाही सन्मान   खांडगाव : दि. ३१ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणाऱ्या खांडगावचे सुपुत्र तथा पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या यशाचा गौरव गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने केला. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार ...

सलग आठव्या वर्षी प्लॅस्टिक स्वच्छता मोहिम; ८ तालुक्यांतील शिवदुर्ग मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   श्रीगोंदा | दि. १९ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये इतिहास, निसर्ग, साहस आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवत महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची १०५ वी मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य अनुभवत भोरगिरी ते भीमाशंकर या सुमारे आठ ...

अवघ्या ८ आणि १० व्या वर्षी चिखल, डोंगर, ओढे तुडवत पावनखिंडीपर्यंत धाव; युवा पिढी घडविणाऱ्या शिवदुर्ग परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम श्रीगोंदा | दि. २६ जुलै २०२६ गणेश कविटकर सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाची प्रेरणा घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण जागवणारी पन्हाळा-पावनखिंड ५२ किलोमीटरची राज्यस्तरीय पदभ्रमंती शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवारातील दोन चिमुकल्या बालमावळ्यांनी बालवयातच यशस्वीपणे पूर्ण केली. अवघ्या ८ वर्षे १० महिन्यांचा ...

नाशिक | दि. २० जुलै २०२६   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दर्जेदार तयारी करता यावी, त्यांच्या ज्ञानाचा पाया अधिक भक्कम व्हावा आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी यशाची शिखरे गाठावीत, या उदात्त हेतूने कै. पुंजाजी ढिकले पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्ध पिंपरी येथील स्व. कमल उत्तमराव ढिकले अभ्यासिकेला यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संदर्भातील अनेक पुस्तके प्रदान करण्यात ...

श्रीगोंदा | दि. ०७ जुलै २०२६ गणेश कविटकर   “मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठे वय लागत नाही; लागते ती फक्त जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास.” या विचाराला साकार रूप देत श्रीगोंदा तालुक्यातील चिमुकली खेळाडू कु. आर्वी विशाल आढाव हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे ३ ते ...

रात्रीच्या अंधारात बसची वाट पाहणाऱ्या दोन तरुणींना स्वतःच्या वाहनातून सुखरूप घरी पोहोचवत खासदार निलेश लंके यांनी जिंकली जनतेची मने श्रीगोंदा |दि. ०६ जुलै २०२६ गणेश कविटकर रात्र गडद होत चालली होती… बसस्थानकावर दोन तरुणी चिंताग्रस्त नजरेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहत होत्या. घर गाठण्याची ओढ, सुरक्षिततेची चिंता आणि बस कधी येईल याची अनिश्चितता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अशाच वेळी ...

दि. 03 जून 2026 गणेश कविटकर जागतिक सायकल दिन विशेष….   “जागतिक सायकल दिनानिमित्त साधेपणा, संघर्ष आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश”   काळ बदलला… माणसांच्या गरजा बदलल्या… वाहतुकीची साधने बदलली. पण आजही गावातील एखाद्या धुळीच्या रस्त्यावरून घंटी वाजवत जाणारी सायकल दिसली की मन नकळत भूतकाळात हरवून जाते. अनेकांच्या आयुष्यातील पहिली गाडी म्हणजे सायकल. अनेकांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवातही याच दोन चाकांपासून ...

UPSC मधून केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती; रेसिडेन्शियल हायस्कूलतर्फे विशेष गौरव श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर अहिल्यानगर : “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या सुविधा किंवा आर्थिक बळाची गरज नसते; जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झालेले महेश ...

तरुण पिढीने पानिपतचा वारसा जपावा – मराठा राजेश कल्याण यांचे आवाहन श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात महाराष्ट्रातून हरियाणात गेलेल्या आणि तेथेच स्थायिक झालेल्या मराठा वीरांच्या वंशजांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राशी भावनिक नाळ जोडण्यासाठी “पानिपत महाराष्ट्र संपर्क अभियान” अंतर्गत श्रीगोंदा शहराला भेट दिली. इतिहास, पराक्रम आणि बंधुत्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा हा दौरा श्रीगोंदेकरांसाठी प्रेरणादायी ...

आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा असं म्हटलं जातं की तरुण पिढीला आपल्या आजी-आजोबांसाठी वेळ नसतो… पण या समजुतीला छेद देत नातवंडांच्या अपार प्रेमाने आणि कृतज्ञतेने उजळलेला एक भावस्पर्शी सोहळा अनुभवायला मिळाला. ज्या हातांनी संस्कार दिले, ज्या डोळ्यांनी पिढ्या घडताना पाहिल्या, त्या पूज्य व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी नातवंडांनी एकत्र येत उभा केलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला. श्री ..रुस्तुम फकीरबुवा महानुभाव ...