शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे. साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या मैनाबाई माळावर असलेल्या शिंदे घराण्यातील ऐतिहासिक छत्री व समाधी स्थळांची शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी ही वारसा स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव, समाधी स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेचा ...
वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ ...
पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार • विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार • प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणार • प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार मुंबई, दि. 23 – पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर ...
लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना…. श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...
श्रीगोंदा पालिकेत भाजपची निर्णायक मुसंडी; २२ पैकी १३ जागा जिंकत सत्ता, नगराध्यक्षपदी सुनिता खेतमाळीस
श्रीगोंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२ पैकी तब्बल १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सुनिता खेतमाळीस यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या शुभांगी पोटे यांचा १,०३७ मतांनी पराभव करत विजयी झेंडा फडकावला. या निकालामुळे भाजपने नगरपालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक व्यवस्थापन, योग्य उमेदवार निवड ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ११ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, श्रीगोंदा येथे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
मुळशी तालुक्यातील भानुदास पानसरे यांच्यासह उबाठाचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पुण्यातील उबाठा गटाचे डॉ. अमोल देवडेकर आणि हडपसरचे प्रशांत तुपे यांच्यासह ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग क्रमांक ७ ब मधील मतदान प्रक्रिया ...









