कार्तिक झेंडेच्या कवितेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरभरून दाद

सातारा :  दि. ०५/०१/२०२६

सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तरुण कवी व व्याख्याते कार्तिक रामदास झेंडे यांनी सादर केलेल्या “माय” या कवितेला मान्यवर साहित्यिकांसह रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

सध्या पुणे येथे बी.ए.एल.एल.बी. चे शिक्षण घेत असलेल्या कार्तिक झेंडेंनी लहानपणापासूनच कविता लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीत आजवर दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून “आयुष्य मातीत रुजवताना” या कवितासंग्रहाला दोन राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

कविता लेखनाबरोबरच कार्तिक हे उत्तम वक्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी विविध राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पारितोषिके पटकावली आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर सादर केलेल्या कवितेतून कार्तिकने ग्रामीण जीवनातील वेदना, मातृत्वाची ताकद आणि मातीशी असलेले नाते अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यांच्या हस्ते कार्तिक झेंडे यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तरुण पिढीतील कवींच्या या यशाने मराठी साहित्यविश्वात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)