कुंभळी (ता.कर्जत, जि. अहिल्यानगर ) – अंधःकारावर प्रकाशाचा, अशुभावर मंगलतेचा आणि दुःखावर श्रद्धेचा विजय साजरा करण्याचा दिवस — दीपोत्सव! अशा या मंगल क्षणी बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कानिफनाथ मंदिर, कुंभळी येथे भक्तिमय वातावरणात दीपोत्सवाचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ कुंभळी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची ...