“संधी उपलब्ध आहेत, गरज आहे ती सातत्यपूर्ण अभ्यासाची” तहसीलदार सचिन डोंगरे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन श्रीगोंदा | दि. 16 ऑक्टोबर 2026 गणेश कविटकर गुणवत्तेचा गौरव, मेहनतीचा सन्मान आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा! विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने अग्नीपंख फाउंडेशनच्या वतीने श्रीगोंद्यात आयोजित करण्यात आलेला ‘विद्यार्थी प्रोत्साहन सोहळा’ उत्साहात पार पडला. या प्रेरणा उत्सवात श्रीगोंदा तालुक्यातील विविध ...

रयत शिक्षण संस्था काळानुरूप बदलणारी आणि माणसं घडविणारी संस्था : अॅड. भगीरथ शिंदे   श्रीगोंदा | दि. २८ सप्टेंबर २०२६ गणेश कविटकर   सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची जाणीव कर्मवीर भाऊराव पाटील यांना होती. त्यामुळेच बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांच्या कार्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीला दिशा मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील ...

श्रीगोंद्यात १५ शाळांची आमदार विक्रम पाचपुतेंकडून पाहणी; कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ‘क्लस्टर स्कूल’चा पर्याय   श्रीगोंदा | दि.३० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवत आमदार विक्रम पाचपुते यांनी मतदारसंघातील १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपलब्धता आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा घेताना कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ...

श्रीगोंदा | दि. २२ जुलै २०२६   आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त बारामती येथील Immortal Chess Academy यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षीय पियूष सुजित गायकवाड याने अंडर-10 गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला. पहिल्याच मोठ्या स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पियूषने सर्वांचे लक्ष वेधून घेत श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ...

श्रीगोंदा| दि. ०६ जुलै २०२६ गणेश कविटकर   “शिक्षण हीच खरी संपत्ती” या विचाराला कृतीची जोड देत अग्नीपंख फाउंडेशनने ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील गरजू व उपेक्षित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. ज्या विद्यालयात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे, अशा संत ज्ञानेश्वर विद्यालयात ...

श्रीगोंदा | दि. ०१ जुलै २०२६ गणेश कविटकर   तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे B.Sc. Artificial Intelligence & Machine Learning (AI & ML), B.Sc. Data Science या नव्या पदवी अभ्यासक्रमांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन B.Sc. Computer Science अभ्यासक्रमाच्या ...

विसापूर | दि. 23 जून 2026 गणेश कविटकर   शिक्षण हीच खरी संपत्ती मानणाऱ्या आणि आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची जाणीव जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी विसापूर येथील सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये एक हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. गरिबीमुळे शिक्षणाच्या वाटेवर अडथळे येऊ नयेत, कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना आर्थिक परिस्थितीची मर्यादा पडू नये, या उदात्त भावनेतून शंभराहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना तब्बल ...

श्रीगोंदा | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   अग्नीपंख फौंडेशनचा स्व. अजित पवार यांना अनोखा श्रद्धांजलीपर उपक्रम……   श्रीगोंदा : लहानग्यांच्या छोट्याशा मुठीत किती मोठी ताकद असते, याचा प्रत्यय श्रीगोंद्यात पुन्हा एकदा आला. “एक मुठ धान्य अनाथांसाठी” या अग्नीपंख फौंडेशनच्या उपक्रमातून तब्बल १५ मेट्रिक टन धान्याचा साठा उभा राहिला. स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना मानवंदना देत हा उपक्रम राबविण्यात ...

घोगरगाव (ता. श्रीगोंदा) : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या अधिकृत नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहविचार सभा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेबद्दलची आपुलकी आणि बांधिलकी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य मा. बाबासाहेब भोस ...

श्रीगोंदा | दि. ०८ जानेवारी २०२६ गणेश कविटकर   श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत वेळू येथील सांगळे वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ हे गीत प्रथम क्रमांकाचे ठरले. या यशाबद्दल सांगळे वस्तीतील नागरिक व पालकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मगर व शिक्षिका तनुजा शिंदे यांनी शाळेतील सुविधा वाढविण्यासह ...