श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या मैनाबाई माळावर असलेल्या शिंदे घराण्यातील ऐतिहासिक छत्री व समाधी स्थळांची शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी ही वारसा स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव, समाधी स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेचा ...
पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार • विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार • प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणार • प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार मुंबई, दि. 23 – पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर ...
मुळशी तालुक्यातील भानुदास पानसरे यांच्यासह उबाठाचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पुण्यातील उबाठा गटाचे डॉ. अमोल देवडेकर आणि हडपसरचे प्रशांत तुपे यांच्यासह ...
श्रीगोंदा शहरात शिवसेनेच्या भव्य रॅलीनंतर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत शहराच्या राजकीय वातावरणाला वेगळी दिशा देणारी भाषणे झाली. सभेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी मनोहारक भाषण करत शिवसेनेच्या विजयशिल पॅनेलची घोषणा केल्यासारखीच आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली. लोखंडे म्हणाले, “मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे हे श्रीगोंदा शहराची अस्मिता आहेत. गेल्या साडेसात वर्षांत पोटे दांपत्याने शहराच्या विकासाचा वेग वाढवला, नवनवीन ...



