महिलांचा पुढाकार; गावात शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड, स्वच्छतेसाठीही ठोस निर्णय श्रीगोंदा | दि. 08 मार्च 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेत गावात ‘शिवीबंदी’चा ठराव मंजूर केला. गावात कोणीही आई – बहिणींवरून शिवीगाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष महिला ग्रामसभेत ...

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; शिस्तप्रिय दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष. कोंभळी|दि. 06 मार्च 2026 गणेश कविटकर कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र कोंभळी येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्याने परिसरात भक्तीचा उत्सवच निर्माण झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरेल निनादात आणि नाथ महाराज्यांच्या घोषणांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या ...

आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा असं म्हटलं जातं की तरुण पिढीला आपल्या आजी-आजोबांसाठी वेळ नसतो… पण या समजुतीला छेद देत नातवंडांच्या अपार प्रेमाने आणि कृतज्ञतेने उजळलेला एक भावस्पर्शी सोहळा अनुभवायला मिळाला. ज्या हातांनी संस्कार दिले, ज्या डोळ्यांनी पिढ्या घडताना पाहिल्या, त्या पूज्य व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी नातवंडांनी एकत्र येत उभा केलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला. श्री ..रुस्तुम फकीरबुवा महानुभाव ...

कोंभळी |दि . ०२ मार्च २०२६ गणेश कविटकर   ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली २७ वे वर्ष   कोंभळी : अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात ...

छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी प्रवास : किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड श्रीगोंदा | दि. 21 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पराक्रम, त्याग आणि धर्मनिष्ठेची साक्ष देणाऱ्या भूमीतून यंदा पुन्हा एकदा धर्मवीरांचा जयघोष दुमदुमला. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने ...

श्रीगोंदा | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   अग्नीपंख फौंडेशनचा स्व. अजित पवार यांना अनोखा श्रद्धांजलीपर उपक्रम……   श्रीगोंदा : लहानग्यांच्या छोट्याशा मुठीत किती मोठी ताकद असते, याचा प्रत्यय श्रीगोंद्यात पुन्हा एकदा आला. “एक मुठ धान्य अनाथांसाठी” या अग्नीपंख फौंडेशनच्या उपक्रमातून तब्बल १५ मेट्रिक टन धान्याचा साठा उभा राहिला. स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना मानवंदना देत हा उपक्रम राबविण्यात ...

श्रीगोंदा  | दि. 19 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर   श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर, श्रीगोंदा परिसरात भक्तिरसाचा वर्षाव; हजारो भाविकांची उपस्थिती   श्रीगोंदा : तालुक्याचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत परंपरेतील महान संत श्री.संत शेख महंमद महाराज यांच्या ३२७ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा नगरी सध्या अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संजीवनी समाधी सोहळा व यात्रा महोत्सवाच्या पावन ...

श्रीगोंदा | दि. १९ फेब्रुवारी २०१६  गणेश कविटकर   पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारव दीपोत्सव – पाचवे वर्ष उत्साहात साजरे   श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर परिसर श्रीगोंदा, काशीबारव (मांडवगण रोड) व बेलवंडी ...

घोगरगाव (ता. श्रीगोंदा) : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या अधिकृत नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहविचार सभा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेबद्दलची आपुलकी आणि बांधिलकी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य मा. बाबासाहेब भोस ...

लहान मुलं व वृद्धांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची जनतेची मागणी……   नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध निर्मिती रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाईत पर्दाफाश केला आहे. जामखेड पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या एका दूध संकलन केंद्रावर छापा टाकून तब्बल १७,३२,८९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ...