श्रीगोंदा | दि. 21 जून 2026 गणेश कविटकर बेलवंडी पोलिसांनी ढवळगाव शिवारात धाडसी कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ढवळगाव येथील हॉटेल रिलॅक्स परिसरात काही व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ...
श्रीगोंदा, दि. २१ जून २०२६ गणेश कविटकर राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे शनिवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. “कर्जमाफीवरील सर्व अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करू,” असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला. शेतकरी, सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे काही ...
श्रीगोंदा दि. 17 जून 2026 श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून, खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) याचे मयत ...
श्रीगोंदा | दि. 16 जून 2026 गणेश कविटकर राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी तालुक्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. शेतकरी नेते राजेंद्र (आबा) म्हस्के यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत ...
श्रीगोंदा | दि. 16 जून 2026 गणेश कविटकर स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडेच केलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईत एक धक्कादायक बाब समोर आली असून, जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या गोण्यांवर आढळलेला सीआर क्रमांक ४६३/२०२६ हा यापूर्वी पोलिसांनीच जप्त केलेल्या गुटखा प्रकरणातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल पुन्हा बाजारात कसा पोहोचला, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ ...
श्रीगोंदा | दि. १५ जून २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवत पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विलास दादा गावडे (रा. पिसोरेखंड, ता. श्रीगोंदा) यास अटक करण्यात ...
श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्मविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून ...
श्रीगोंद्यातील कारवाईत उघड झाली धक्कादायक बाब; गोण्यांवर आढळला पोलिसांचा सीआर क्रमांक, चौकशीची मागणी श्रीगोंदा | दि. 15 जून 2026 गणेश कविटकर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरात केलेल्या छापेमारीत लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केला. मात्र या कारवाईत समोर आलेल्या एका गंभीर बाबीमुळे संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. ज्या गोण्यांमध्ये हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्या ...
एकाच बारवेवर दोन शिलालेख; जलसंवर्धन, दानपरंपरा आणि लोककल्याणाचा दुर्मीळ वारसा दि. 14 जून 2026 गणेश कविटकर कर्जत तालुका – शिलालेख वाचन – भाग – 8 अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे शहर केवळ व्यापारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे, तर ऐतिहासिक वारशामुळेही विशेष महत्त्वाचे ठरत आहे. कर्जत-शिंदेवाडी मार्गालगत असलेल्या एका प्राचीन बारवेवर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचे दोन शिलालेख आढळून आले असून, या शिलालेखांमधून ...
श्रीगोंदा | दि. 14 जून 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या एका दिवसात मुंबई येथून शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. १० जून रोजी ...









