श्रीगोंदा | दि. ०६ जानेवारी २०२६ गणेश कविटकर, श्रीगोंदा   समाजाच्या आरोग्यासाठी सातत्याने झटणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहावा, या प्रेरणादायी उद्देशातून पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील पाटील मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या सहकार्याने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला यशस्वी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, ...

श्रीगोंदा | दि. ०५ जानेवारी २०२६ गणेश कविटकर,   महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…   स्थानिक युवकांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करून त्यांना उद्योगजगतात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराजा जिवाजिराव शिंदे महाविद्यालयात नवउद्योजकता विकास व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या ...

सातारा :  दि. ०५/०१/२०२६ सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तरुण कवी व व्याख्याते कार्तिक रामदास झेंडे यांनी सादर केलेल्या “माय” या कवितेला मान्यवर साहित्यिकांसह रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. सध्या पुणे येथे बी.ए.एल.एल.बी. चे शिक्षण घेत असलेल्या कार्तिक झेंडेंनी लहानपणापासूनच कविता लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीत आजवर दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले ...

पानिपत वीरांच्या स्मृतींना अभिवादन; वारसा संवर्धनाचा जागर     श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराच्या उत्तर वेसजवळ असलेली, पानिपतच्या रणभूमीशी नाते सांगणारी ऐतिहासिक दिल्ली वेस ही शिंदेशाही ज्वलंत इतिहासाची साक्ष आहे. या दुर्लक्षित पण मौलिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी श्रमदानातून नववर्षाचे स्वागत ...

श्रीगोंदा नगरपालिकेला नवी दिशा; पदभार स्वीकारताना ठाम राजकीय संदेश…   श्रीगोंदा : “नगराध्यक्षपद ही सत्तेची खुर्ची नसून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे साधन आहे,” असे ठाम आणि परखड शब्दांत सांगत सुनिता संतोष खेतमाळीस यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सामान्य जनतेच्या विश्वासावरच आपली राजकीय वाटचाल उभी राहील, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी दुःखापासून सुखापर्यंत कायम पाठिशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महान उद्योजक रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंध उद्योजक भावेश भाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त अग्नीपंख फाउंडेशन, श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा ते नायगाव अशी तब्बल १३७ किलोमीटरची ‘प्रेरणा सायकल वारी’ उत्साहात पार पडली. या उपक्रमाचा समारोप नायगाव येथे करण्यात आला. यावेळी उद्योजक व महिला खेळाडूंचा सन्मान, तसेच ‘उद्योग विश्वातील रिअल हिरो’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात ...

चिखली (ता. श्रीगोंदा) : पाणीटंचाईवर मात करत गावाच्या शाश्वत विकासाकडे नेणारा प्रेरणादायी उपक्रम चिखली येथे साकार झाला आहे. पुणे येथील रेलफॉर लॅब्ज व सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि.चे सर्वेसर्वा, प्रसिद्ध उद्योगपती दीपक नाथानी यांच्या सेवादीप फाउंडेशनच्या माध्यमातून चिखली गावातील पुष्पतलाव व विजयतलाव या दोन तलावांचे गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. या जलसंधारण कामांचे लोकार्पण उद्योगपती दीपक नाथानी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार ...

श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तसेच गौरी शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात आणि स्व. कुणाल दरेकर यांच्या अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा येथे तीव्र रास्तारोको आंदोलन केले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. ...

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे.   साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या मैनाबाई माळावर असलेल्या शिंदे घराण्यातील ऐतिहासिक छत्री व समाधी स्थळांची शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी ही वारसा स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव, समाधी स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेचा ...