खून प्रकरणातील आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त

श्रीगोंदा | दि. १५ जून २०२६

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवत पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विलास दादा गावडे (रा. पिसोरेखंड, ता. श्रीगोंदा) यास अटक करण्यात आली होती. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी मंजूर केली.

पोलीस कोठडीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीनुसार मेमोरँडम पंचनाम्याच्या आधारे खूनाच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आले. या जप्तीमुळे गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, राहुल मोढळे आणि शरद चौभे यांनी पार पाडली.