सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने चालू ५१ व्या गळीत हंगामात सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ३१५० रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस दर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता ३००० रुपये तात्काळ देण्यात येणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली. ...
शिवदुर्गची शिवशौर्य गाथा : महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावर ऐतिहासिक व प्रेरणादायी मोहिम
महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली. बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...
गौरी शुगरच्या प्रदूषणाविरोधात शेतकरी व नागरिकांचा उद्रेक श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाने परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कारखान्यातून दररोज बाहेर पडणारी काळी राख ...
•९० हजार ब्रास जादा उत्खनन • कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश नागपूर, दि. १२ डिसेंबर २५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. ...
श्रीगोंदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयातच आपल्या इतिहासाची, निसर्गाची आणि वारशाची ओळख करून देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्ती (टाकळी कडे) शाळेत राबविण्यात आला. पहिली ते चौथीतील एकूण २३ विद्यार्थ्यांना साकळाई व महिंदेश्वर डोंगररांगेत मिनी ट्रेकिंग घडवून आणत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त डोंगरसंस्कृतीचे बाळकडू देण्यात आले. सकाळच्या प्रहरी सुरू झालेल्या या अभ्यास सहलीत ...
नागपूर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक, रेडिओ क्षेत्रातील गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया – VOM इंटरनॅशनल फोरम’तर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण स्टेडियम येथे आंदोलन व उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये पत्रकार महामंडळास निधी उपलब्ध करणे, थकीत सरकारी बिले देणे, जाहिरात ...
श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या तब्बल १६० मावळ्यांनी कोयना धरणातील सर्वात उंच बेट किल्ला वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकजण ज्या भावनेने एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच प्रेरणेने मावळ्यांनी ‘मी अवयव दान व रक्तदान करणार’ अशी हृदयस्पर्शी शपथ घेतली. शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या काठी बामनोली येथे कॅम्पिंग करण्यात आले. रविवारी सकाळी ४५ मिनिटांच्या जलप्रवासानंतर सर्व ...
श्रीगोंदा : गौरी शुगरने चालू गाळप हंगामात दोन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. देवदैठण येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिटमुळे गाळप क्षमतेत वाढ झाली असून, या हंगामासाठी तब्बल दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३२०० रुपये भाव जाहीर ...
श्रीगोंदा : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., श्रीगोंदा यांच्या घारगाव शाखेकडून दि. ०४ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. भास्कर आश्रू निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदा) यांना ३ लाख रुपये कर्ज देण्यात आले होते. कर्जफेडीसाठी निंभोरे यांनी संस्थेला धनादेश दिला. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे तो धनादेश बँकेत अनादरित झाला. या प्रकरणी संस्थेने श्रीगोंदा न्यायालयात दाद मागितली होती. संबंधित ...
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे 2009 सालच्या बारावी कला बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे जाज्वल्य उदाहरण घालत 117 पुस्तकांची मूल्यवान भेट दिली. अंदाजे 20,000 रुपयांच्या किंमतीची ही पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयाला सप्रेम अर्पण करण्यात आली असून, ग्रंथालय समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे. या उपक्रमात किशोर गुंजाळ, ...









