सांगळे वस्ती शाळेचे ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ गीत ठरले नंबर वन……

श्रीगोंदा | दि. ०८ जानेवारी २०२६

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत वेळू येथील सांगळे वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ हे गीत प्रथम क्रमांकाचे ठरले. या यशाबद्दल सांगळे वस्तीतील नागरिक व पालकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मगर व शिक्षिका तनुजा शिंदे यांनी शाळेतील सुविधा वाढविण्यासह शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर दिल्याने सांगळे वस्तीची शाळा हळूहळू स्मार्ट शाळेकडे वाटचाल करीत आहे.

नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.

हस्ताक्षर स्पर्धा – विद्या मारुती वडवकर (प्रथम)

वेशभूषा स्पर्धा – श्रद्धा बाळासाहेब दातीर (प्रथम)

वक्तृत्व स्पर्धा – ऋतिका योगेश डेबरे (तृतीय)

वेशभूषा स्पर्धा – मयुरी हेमराज सांगळे (तृतीय)

“मी सांगळे–वेळूच्या शाळेमुळे घडलो,” ही भावना व्यक्त करत प्रा. केशव सांगळे यांनी सांगळे वस्ती शाळेला चार, वेळू शाळेला दोन व मुंजाबा वस्ती शाळेला दोन असे एकूण आठ संगणक भेट देत संगणक शिक्षणासाठी प्रात्यक्षिक सुविधा उपलब्ध करून दिली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व माजी विद्यार्थी पुढाकार घेत असून गणेश वडवकर, नरेंद्र सांगळे, सतीश डेबरे, सचिन माने यांनी शाळेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

या उपक्रमाचे गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता वाजे तसेच केंद्रप्रमुख माणिक आढाव यांनी विशेष कौतुक केले.