धनादेश अनादरण प्रकरणी आरोपीस सहा महिन्यांचा कारावास व दंड

श्रीगोंदा : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., श्रीगोंदा यांच्या घारगाव शाखेकडून दि. ०४ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. भास्कर आश्रू निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदा) यांना ३ लाख रुपये कर्ज देण्यात आले होते. कर्जफेडीसाठी निंभोरे यांनी संस्थेला धनादेश दिला. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे तो धनादेश बँकेत अनादरित झाला.

 

या प्रकरणी संस्थेने श्रीगोंदा न्यायालयात दाद मागितली होती. संबंधित दाव्याची सुनावणी दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी श्री. भास्कर निंभोरे यांना ६ महिन्यांचा सश्रम कारावास आणि ४,७०,००० रुपये दंड ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तसेच, दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिन्याच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेश न्यायाधीश श्री. एच. जे. पठाणसाहेब यांनी दिले.

 

या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने अॅड. प्रवीण बी. क्षीरसागर व अॅड. प्रमिला ए. पाटील यांनी कामकाज पाहिले. संस्थेचे वसुली अधिकारी श्री. संदीप ज्ञानदेव दरवडे यांनी त्यांना आवश्यक सहकार्य केले.