शिवसेनेच्या धनुष्याचा बाण घड्याळाचा काटा

श्रीगोंदा – अखेर ४ पॅनल नगर परिषद निवडणुकीत भाजप,एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा,महाविकास आघाडीने, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे उतरले असून समझोता एक्सप्रेस घसरली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी यापुढे चर्चा नाही,तडजोड नाही उलट आम्हाला पाठिंबा द्या असे सांगितले तर माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आम्ही स्वतंत्र पॅनल केल्याने आता चर्चा नाही अशी भूमिका घेतली तर भाजप आमदार म्हणतात भाजप विरुद्ध हे सगळे पॅनल आहेत.पॅनल निर्मिती आणि पॅनल मधील उमेदवार पाहता अनेक बाबींवर प्रकाश पडतो.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या पॅनल मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसतात तर भाजपच्या पॅनल मध्ये गेल्या आठवड्यात प्रवेश केलेल्या ५ जणांना उमेदवारी मिळाल्याचे दिसते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना,आणि काँग्रेस मधील अनेक नवे चेहरे दिसतात. महा विकास आघाडी पॅनल मध्ये देखील जुन्या कार्यकर्त्यांची वानवा आहे.
आता हे ४ पॅनल का झाले याची चर्चा शहरात रंगली आहे. मागील वेळी मनोहर पोटे यांनी बाबासाहेब भोस यांना बरोबर घेत काँग्रेसची उमेदवारी मिळवली पुढे त्यांच्या पत्नी शुभांगीताई पोटे नगराध्यक्षा बनल्या काही वर्षांनी भोस आणि मनोहर पोटे यांच्या मध्ये मतभेद झाले. अनेक नगरसेवक पोटे यांना सोडून गेले.
पुढे विधानसभा निवडणुकीत पोटे यांनी बाबासाहेब भोस आणि विरोधात गेलेले नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याने. पोटे यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या ताफ्यात एन्ट्री केली. पोटे जगताप यांची जोडी जमली निवडणुकी नंतर पोटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला तर माजी आमदार राहुल जगताप,सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ओबीसी नेते अण्णासाहेब शेलार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस कडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसल्याने राहुल जगताप यांच्या मनात मनोहर पोटे यांना पाठिंबा देण्याचा विचार होता. हे शिवसेना उपनेते काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी हेरले त्यांनी महाविकास आघाडीचा पॅनल करण्यासाठी भोस यांना प्रोत्साहन दिले. तो प्रयोग यशस्वी ठरला कारण भोस आणि पोटे विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अट घातली मनोहर पोटे नगराध्यक्ष पद उमेदवार नको यात राहुल जगताप यांनी मध्यस्थी केली पण यश मिळाले नाही.
तिसरा पॅनल होणार हे स्पष्ट होतच जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेतेमंडळींना स्वतंत्र पॅनल करत नगराध्यक्ष पद उमेदवार माजी उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर यांच्या नावाची घोषणा केली. भोस यांच्या पॅनल मुळे बॅक फूट वर पडलेल्या पोटे यांना संजीवनी मिळाली आता सर्वांचे लक्ष्य पोटे यांना खिंडीत पकडण्याचे होते. राहुल जगताप वगळून त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यासाठी बैठका सुरू झाल्या. खऱ्या पण माघार कोणी घ्यायची यावरून दुमत पडले अर्ज मागे घेण्याच्या दिवशी देखील तोडगा निघू शकतो पण कोणता उमेदवार बदलायचा यावर त्यांची मते जाग्यावर राहतील का ? हा मोठा प्रश्न आहे. कारण निर्णय घेताना पोटे यांना अडचण निर्माण करणे हा हेतू आहे. पण उमेदवार फार जलद घोषित केल्याने आता खेडकर यांना माघार घेण्यास सांगणे म्हणजे त्यांच्या समर्थकांची मते पोटे यांना विनासायास मिळणार भोस यांनी खेडकर यांना पाठिंबा दिला तर भोस समर्थक पोटे यांच्या प्रचारात दिसणार हा धोका आहे. या सर्व नेत्यांचे काय ठरते यावर भाजप आमदार विक्रम पाचपुते उमेदवार ठरवणार त्यामुळे ए किंवा बी फॉर्म ठेवला जाणार आहे .
सध्या तरी भोस यांच्या पॅनल साठी साजन पाचपुते तर पोटे यांच्या पॅनल साठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील मुरब्बी नेता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पॅनल साठी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे,ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ओबीसी नेते अण्णासाहेब शेलार हे नेतृत्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीत नेते मंडळी एकदिलाने खासदार निलेश लंके यांच्या प्रचारात फिरत होती. म्हणून श्रीगोंदा शहरात लंके यांना मताधिक्य मिळाले आज एकदिलाने काम करणारे एकत्र नाहीत. ४ पॅनल मध्ये विखुरले इस दिलके तुकडे हजार हुए कोई इस पॅनल मे खडा कोई उस पॅनल से खडा