आज दिसणारी लढत चोरंगीं दिसत असली तरी पुढे चालून पाचपुते विरुद्ध सर्व अशी होऊ शकते? – आ. विक्रम पाचपुते

श्रीगोंदा : आगामी नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून जनतेच्या अपेक्षांचा आदर करत भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सुनिता संतोष खेतमाळीस यांची भाजपाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

 

 

दरम्यान, सध्या चार प्रमुख पॅनेलांमध्ये चौरंगी लढत दिसत असली तरी पुढील काही दिवसांत ही लढत “पाचपुते विरुद्ध सर्व” अशा स्वरूपात बदलू शकते, असा दावा आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. आमदार पाचपुते पुढे म्हणाले,“आम्ही आमचं काम चोखपणे व पारदर्शकतेने पार पाडत आहोत. जनतेच्या सेवेला आमचा कटाक्ष आहे. विरोधकांनी आमचे टीकास्त्र सोडण्यापेक्षा स्वतःचे कामकाज आणि भूमिका यांचा विचार करावा.”

भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी पॅनेलांसाठी नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. येणाऱ्या काही दिवसांत विविध पक्षांकडून होणाऱ्या घोषणांवर मतदारांचेही लक्ष लागले आहे.श्रीगोंद्यातील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार आणि राजकीय दृष्ट्या रोचक होणार यात शंका नाही.