श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. “गरीबाची कुणीही अफवा करतात, पण आम्ही जनतेच्या विश्वासावर उभे आहोत,” असे वक्तव्य करत बाबासाहेब भोस यांनी आघाडीची स्पष्ट धोरणे आणि भूमिका मांडली.
महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदा सह २२ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यंदाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आता कसलीही तडजोड नाही. ज्यांना खऱ्या अर्थाने लोकहिताचा विचार करायचा आहे त्यांनी आमच्या पॅनलला पाठिंबा द्यावा,” असे भोस यांनी आवाहन केले.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्य विरोधक भाजप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, यामुळे निवडणूक अधिक रंगतदार व चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीतील सर्व उमेदवारांनी एकजुटीने काम करत प्रभावी प्रचार करण्याचा संकल्प घेतला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज दाखल होताच शहरात राजकीय चर्चांना वेग आला असून, श्रीगोंद्यातील निवडणूक वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.