भारतीय औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची ठरणारी कामगिरी करत चैतन्य हेवी इक्विपमेंट्स या प्रतिष्ठित कंपनीला ह्युंदाईतर्फे ‘सर्वात मोठा जागतिक डीलर’ म्हणून गौरविण्यात आले. २०२५ मधील जागतिक डीलर सल्लागार समिती (Global Dealer Advisory Committee) बैठकीत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याने भारतीय उद्योगजगताचा नावलौकिक वाढवला आहे.
या महत्त्वपूर्ण यशाचा श्रेय कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रगतीला, गुणवत्तापूर्ण सेवांना आणि ग्राहक व भागीदारांच्या मजबूत विश्वासाला जाते. चैतन्य हेवी इक्विपमेंट्सने अल्पावधीतच विक्री, सेवा आणि जागतिक मानकांची अंमलबजावणी या सर्व पातळ्यांवर उत्कृष्टता सिद्ध केली आहे.
पुणे शहरातील तरुण व गतिमान उद्योजक श्री सोमनाथ होळकर यांनी कंपनीच्या वतीने हा जागतिक सन्मान स्वीकारला. ह्युंदाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या नेतृत्वदृष्टीची आणि कंपनीच्या टीमच्या परिश्रमाची महत्वपूर्ण नोंद आहे.
इस्तंबूल येथे पार पडलेल्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठित डीलर्सनी उपस्थित राहून कंपनीच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणारा हा क्षण उद्योग क्षेत्रातील अनेक युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.नव्या उंचीवर झेप—दृष्टिकोन, मेहनत आणि गुणवत्ता यांचे त्रिकूट यशाचे सूत्र असल्याचे चैतन्य हेवी इक्विपमेंट्सने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
( गणेश कविटकर, श्रीगोंदा )
