समाजबंधाची हाक…..अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देत प्रेरणादायी पुढाकार

           राज्यातील अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी समाजाने हात पुढे करणे ही काळाची गरज असताना, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे.

             इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चर (ICCOA) च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ₹53,000 देणगीचा धनादेश प्रदीप सकट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात आला. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना मदतीचा हात देण्याचा उद्देश या देणगीतून स्पष्ट दिसतो. समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांची जपणूक यांचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदीप सकट आणि ICCOA टीमचे मनःपूर्वक आभार मानत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “संकटाच्या काळात समाजातील विविध घटक पुढे येतात, तेव्हा सरकारची मदत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकते,” असे त्यांनी नमूद केले.

अशा उपक्रमांमुळे अतिवृष्टीग्रस्तांच्या मनात नवे धैर्य व अपेक्षेचा किरण निर्माण होतो. प्रदीप सकट यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही ते अशाच सामाजिक कार्यात अग्रेसर राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही मदत नाही… तर माणुसकीची साथ आहे. आणि हीच समाजाला नवचैतन्य देणारी खरी प्रेरणा आहे.